शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका शाळा पुनर्बांधणी कासव गतीने

By सदानंद नाईक | Updated: February 20, 2024 20:50 IST

तीन महिन्यात नुसते खोदकाम.

उल्हासनगर : खेमानी येथील महापालिका शाळा क्रं-१८ व २४ च्या इमारतीच्या पुनर्बांधणीला गेल्या ७ वर्षानंतर मुहूर्त लागला आहे. मात्र पुनर्बांधणीचे काम संथ गतीने सुरू असल्याने, शाळा इमारत कधी उभी राहणार असा प्रश्न स्थानिक नागरिकांसह समाजसेवक प्रवीण माळवे यांनी केला.

 उल्हासनगर महापालिकेने शाळा पुनर्बांधणीच्या नावाखाली खेमानी येथील शाळा क्रं-१८ व २४ ची इमारत ७ वर्षांपूर्वी जमीनदोस्त केली. तेंव्हा पासून शाळा इमारतीच्या पुनर्बांधणीला मुहूर्त लागला नाही. शाळेतील हजारो मुले एका खाजगी शाळेच्या छताखाली शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. स्थानिक मुलांना ही शाळा लांब पडत असल्याने, असंख्य विद्यार्थांनी शाळेला सोडचिट्ठी दिली. तर काही मुलांनी इतर शाळेत प्रवेश घेतला. त्यामुळे शाळेतील पटसंख्या अर्धीही राहिली नाही. असा आरोप समाजसेवक प्रवीण माळवे यांनी केला. शाळेची पुनर्बांधणी लवकर होण्यासाठी माळवे यांनी सतत ७ वर्ष महापालिकेसह वरिष्ठ अधिकाऱ्या सोबत पाठपुरावा केला होता. अड्डीच महिन्यांपूर्वी शाळा पुनर्बांधणीचे ऑनलाईन उदघाटन झाले असून शाळा इमारतीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र शाळा इमारतीचे काम याच गतीने सुरू राहिल्यास, बांधकाम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारीत आहेत. 

खेमानी येथील महापालिका शाळा क्रं-१८ व २४ व चोपडा येथील शाळा क्रं-१७ ची इमारत तसेच अभ्यासिकेचे एकाच दिवशी ऑनलाइन भूमिपूजन झाले होते. मात्र शाळा क्रं-१७ च्या इमारतीचे काम उभारणीला आले. तर दुसरीकडे खेमानी येथील शाळेचा पायाभरणीच सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी खेमानी शाळा इमारत उभी करण्याची मागणी स्थानिक नागरिक व समाजसेवक प्रवीण माळवे यांनी लावून धरली आहे. नवीन इमारती मध्ये शाळा सुरू झाल्यास, शाळेत मुलांची संख्या वाढण्याची माहिती स्थानिक नागरिक देत आहेत.  महापालिका शाळा इमारतीला मुहूर्त महापालिका शिक्षण विभागाच्या लेखा अधिकारी नीलम कदम यांनी शाळा क्रं-१८ व २४ च्या इमारतीची पुनर्बांधणीला सुरवात झाल्याची माहिती दिली. पावसाळयापूर्वी इमारत उभी राहण्याचे संकेत कदम यांनी देऊन इतर शाळा इमारतीची पुनर्बांधणी टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर