शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पालिकेत नालेसफाईवरून महासभेमध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:59 IST

अधिकाऱ्यांना धारेवर धरले

उल्हासनगर : शहरातील नालेसफाईचा दावा फोल ठरवत गुरूवारी झालेल्या महासभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अशा कंत्राटदाराला काळया यादीत टाका, पुन्हा कंत्राट देऊ नका असे नगरसेवकांनी सांगितले. दरम्यान, सातवा वेतन आयोगाच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली.उल्हासनगर महापालिका महासभा वादळी ठरणार असे बोलले जात होते. विरोधी पक्षनेते धनजंय बोडारे, सुनील सुर्वे व शेखर यादव यांनी अपुरे अधिकारी व कर्मचारी वर्गामुळे महापालिका कारभारात गोंधळ उडाला असून स्थानिक अधिकाºयांना प्रतिनियुक्तीवरील अधिकारी नको, असा आरोप सुर्वे यांनी केला. तर चार वर्षात आलेल्या आयुक्तांनी काय काम केले? ते थोडक्यात सांगा, अशी विनंती शिवसेना नगरसेवक शेखर यादव यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना केली. देशमुख यांनी यापूर्वीच्या परिस्थितीला तत्कालिन आयुक्तांसह तुम्हीही जबाबदार असल्याचे सांगून मागचे विसरा. यापुढे सोबत येऊन शहर विकासाचे काम करू, असे उत्तर दिले.भाजप गटनेते जमनुदास पुरस्वानी यांनी पावसाळयापूर्वी शहरातील नालेसफाईबाबत लक्षवेधी मांडली. बहुतांश नगरसेवकांनी नालेसफाईवर प्रश्नचिन्हे उभे करून आपापल्या प्रभागातील नाले अद्यापही तुंबलेले असल्याचे सांगितले. तर मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी सर्वच मोठ्या नाल्याचा आढावा घेत नालेसफाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. एकूणच महापालिकेचा नाले सफाईचा दावा फोल ठरला असून लहान नाल्याची सफाईची अशीच दुरवस्था असल्याचे नगरसेवकांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.दरम्यान, कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव आला. यावरून भाजपचे प्रदीप रामचंदानी, राजेश वधारिया, जमनुदास पुरस्वानी यांनी प्रस्तावातील तुटी आयुक्तांच्या लक्षात आणून दिल्या. प्रस्ताव फेटाळणार की काय? असे चरणसिंग टाक व राधाकृष्ण साठे यांना संशय आल्याने, सभागृहाबाहेर गेले.महापालिकेचे सर्वच विभाग झोपलेले?महापालिका प्रशासनावर अंकुश राहिला नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी केला. नगररचनाकार, बांधकाम विभाग, आरोग्य विभागासह इतर विभाग झोपलेले असून विभागात चैतन्य आणण्यासाठी प्रतिनियुक्तीवरील अधिकारी आणा किंवा कंत्राटी पध्दतीने अधिकाºयांची भरती करा, असे बोडारे यांनी आयुक्तांना सूचविले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर