शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

उल्हासनगरच्या महासभेत पुन्हा पाण्यावरून राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 06:51 IST

पाणीटंचाईवरून पुन्हा सर्वपक्षीय नगरसेवकांनी उल्हासनगरच्या महासभेत सोमवारी एकच गोंधळ घातला. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले.

उल्हासनगर - पाणीटंचाईवरून पुन्हा सर्वपक्षीय नगरसेवकांनी उल्हासनगरच्या महासभेत सोमवारी एकच गोंधळ घातला. गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्तांना दिले. त्यातही अपूर्ण पाणीयोजना पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रूपये तातडीने मिळावेत, यासाठी आग्रह धरल्याने त्याचीच सर्वाधिक चर्चा रंगली होती.उल्हासनगरच्या विकासकामांसह नगरसेवक व प्रभाग समिती निधीतील कामे सुरू होत नाही, तोपर्यंत महासभा चालू देणार नाही, असा पवित्रा सर्वपक्षीय नगरसेवकांनी गेल्या महासभेत घेतला होता. पण आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी घनकचरा व्यवस्थापन कराला मान्यता दिली जात नाही, तोपर्यंत मूलभूत कामाव्यतिरिक्त इतर कामाना मंजुरी देता येणार नाही, असा प्रवित्रा घेतला होता. या प्रकाराने महापालिका आयुक्त विरूध्द नगरसेवक असा सामना रंगला. मात्र एका आठवड्यात चित्र पालटले आणि शहरहितासाठी नगरसेवक व आयुक्तांनी एक पाऊल मागे घेतले आणि महासभा पार पडली.ती सुरू होताच पाणीप्रश्नी सर्व नगरसेवक आक्रमक झाले. जलवाहिन्यांची गळती वर्षानुवर्ष सुरू असली, तरी दुरूस्ती होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाचे डॉ प्रकाश नाथानी, राजेश वानखडे, शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, सुनील सुर्वे, अरूण अशांत, रिपाइंचे भगवान भालेराव आदींनी पाणीप्रश्न लावून धरला. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांनी गळतीबाबत उत्तर दिले, पण एकाच ठिकाणी वारंवार गळती का होते, या नगरसेवकांच्या प्रश्नावर ते निरूत्तर झाले.५० कोटींच्या निधीसाठीशहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा व गळती शून्यावर आणण्यासाठी ३०० कोटीची पाणीपुरवठा योजना कोणार्क कंपनीमार्फत राबवण्यात आली. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही. आता हे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ५० कोटी मिळावेत, यासाठी आटापिटा सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.पदोन्नती, नोकरभरती रेंगाळणारच्महापालिकेत अधिकांºयाची ७० टक्के, तर वर्ग ३ व ४ ची ३५ टक्के पदे रिक्त आहेत. काही पदे पदोन्नतीने व काही सरळसेवा भरतीने घेण्याचा निर्णय झाला होता.च्तसेच अनुकंपातत्वावरील नोकरभरतीतील वादही चव्हाट्यावर आले. पण पालिकेच्या खर्चाचा विचार करता एवढी पदे भरण्यास परवानगी मिळणार नसल्याचे आयुक्तांनी दाखवून दिल्याने ही पदे भरण्याची प्रक्रिया रेंगाळणार असल्याचे मानले जाते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर