शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

उल्हासनगर पोटनिवडणूक : ओमींचे बाउंसर, राष्ट्रवादीत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 06:27 IST

महापालिका पोटनिवडणुकीत हाणामारीचे दोन अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. ३८ टक्के मतदान झाले. शुक्रवारी सकाळी संथगतीने सुरू झालेले मतदान शेवटच्या दोन तासात वाढले.

उल्हासनगर - महापालिका पोटनिवडणुकीत हाणामारीचे दोन अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. ३८ टक्के मतदान झाले. शुक्रवारी सकाळी संथगतीने सुरू झालेले मतदान शेवटच्या दोन तासात वाढले. मतदान केंद्रासमोर रांगा लागल्या होत्या. दसरा मैदान येथील शिवसेना शाखेसमोर ओमी कलानी यांचे बाऊंसर व राष्ट्रवादी पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. तर भाटिया चौकात राष्ट्रवादीचे गंगोत्री व ओमी आमनेसामाने आल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते.प्रभाग क्रमांक १७ ची पोटनिवडणूक भाजपा-ओमी टीम व राष्ट्रवादी-शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. सकाळपासूनच ओमी सहकाऱ्यांसोबत प्रभागात ठाण मांडून बसले होते. त्यांच्या सोबतीला ओमी टीमच्या पदाधिकाºयांसह भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी, प्रदेश सचिव प्रकाश माखिजा उपस्थित होते. तर दुसºया बाजूला राष्ट्रवादीचे शहर निरीक्षक सुधाकर वडे, नगरसेवक सुनिता बगाडे, माधव बगाडे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, गटनेते रमेश चव्हाण, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड होते.कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानाशेजारील शिवसेना शाखेसमोर राष्ट्रवादीचे शंकर यांच्यासह दोन कार्यकर्ते व ओमी यांचे बाऊंसर समोरासमोर आले. त्यांच्यात वाद होवून हाणामारी झाली. हिललाईन पोलिसांनी त्वरीत धाव घेवून दोन्ही गटातील ११ जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये कलानी यांच्या ९ बाऊंसरचा समावेश होता. त्यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. भाटिया चौकात ओमी समर्थकांसह आल्याचे समजताच राष्ट्रवादीचे गंगोत्री हेही समर्थकांसह चौकात गेले.दोन्ही आमनेसामने आल्यावर तू तू मैं मैं झाली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक असल्याने ओमी यांनी काढता पाय घेतला. पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी प्रभागाचा आढावा घेवून राज्य राखीव दलाच्या जवानांसह चोख बंदोबस्त ठेवला होता.आज सकाळी मतमोजणीप्रभाग समिती क्रं-४ मध्ये उद्या सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून अर्ध्या तासात निकाल जाहीर होईल अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.बाजी कोण मारणार?ओमी टीमच्या साक्षी पमनानी, राष्ट्रवादीच्या तिकीटावर सुमन सचदेव, काँॅग्रेस पक्षाच्या तिकीटावर जया साधवानी व अपक्ष म्हणून सुरेखा सोनावणे निवडणूक रिंगणात होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरElectionनिवडणूक