शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

यूएलसीची ६00 कोटींची जमीन विकली, पाच जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 02:49 IST

पाच जणांवर गुन्हा दाखल : हस्तांतरणास बंदी

मीरा रोड : नागरी जमीन कमाल धारणा कायद्याखाली हस्तांतरणास बंदी असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन परस्पर विक्री केल्याप्रकरणी ठाणे नागरी संकुलन विभागाच्या तक्रारीनंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, हस्तांतरणास बंदी असताना विक्री व्यवहाराची झालेली नोंदणी, सातबारा सदरी झालेला फेरफार आणि महापालिकेने या ठिकाणी तब्बल २२ मजल्यांच्या सात टॉवरना दिलेली परवानगी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बाजारभावाप्रमाणे या जमिनीची किंमत सुमारे ६०० कोटींच्या घरात असून, यात शासनाचे काही कोटींचे नुकसान व फसवणूक झाल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

काशिमीरा येथील महाजनवाडी भागात साडेचौदा एकर जमीन ही झवेरी कुटुंबीयांच्या नावे होती. नागरी जमीन कमाल धारणा कयद्याच्या कलम २० अन्वये सदर जमीन हस्तांतरणास बंदी होती. असे असताना सुमारे १० वर्षांपूर्वी या जमिनीची नोंदणीकृत कराराने विक्री करण्यात आली.याप्रकरणी शासनस्तरावर झालेल्या तक्रारीनंतर शासन आदेशाने ठाणे नागरी संकुलन विभागातील सहायक नगररचनाकार नितीन जाधव यांच्या फिर्यादीवरून काशिमीरा पोलीस ठाण्यात आशीष चंद्रसेन झवेरी, नंदिता चंद्रसेन झवेरी ऊर्फ नंदिता प्रवीण देसाई, यामिनी रामनिक कपाडिया, अनिता भाटिया व शालिनी चंद्रसेन झवेरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, सदर जमीन संघवी बिल्डर्सला नोंदणीकृत करारनाम्याने विक्री करण्यात आली असून, याठिकाणी संघवी इकोसिटी नावाने तब्बल २२ मजल्यांच्या सात टॉवरचा गृहनिर्माण प्रकल्प महापालिकेने मंजूूर केला आहे. यातील दोन विंगचे काम पूर्ण होऊन सदनिकांची विक्री झालेली आहे. आता गुन्हा दाखल झाल्याने हा बांधकाम प्रकल्पसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, यूएलसीच्या कलम २० खालील जमीन हस्तांतरणास बंदी आहेच; शिवाय यात शासनाला सदनिका देय असतात. आर्थिक दुर्बल घटकांसाठी मंजूर सदनिकांचीच बांधणी व विक्री करण्याची अटही असते.अधिकारी, बिल्डरच्या चौकशीची मागणीयाआधी भार्इंदर पश्चिम भागातील यूएलसी जमीन घोटाळ्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करून, काही बिल्डरांना अटक केली होती. यूएलसी घोटाळ्याच्या अन्य तक्र्रारीसुद्धा प्रलंबित आहेत. या गुन्ह्यात अजून तरी केवळ जमीनविक्री करणाºयांनाच आरोपी बनवले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणात संबंधित असलेले विविध विभागांचे अधिकारी, बिल्डर आदींची सखोल चौकशी करून यात गुंतलेल्यांसह इतरांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :thaneठाणे