शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

"अतिरेक करू नका...अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल"; खासदार राजन विचारे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 21:38 IST

नवनियुक्त जिल्हाप्रमुख केदार दिघेंसोबत विचारे यांचे शक्ती प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : आम्ही शिवसैनिक आहोत,तेव्हा अतिरेक करू नका, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता दिला आहे. ठाण्याच्या शिवसेनेत रविवारी नविन नियुक्त्या जाहिर झाल्यानंतर सोमवारी विचारे तसेच नवनियुक्त पदाधिकारी आणि काही शिवसैनिकांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी आणि आनंद आश्रमात शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. फुटीनंतर प्रथमच विचारे यांनी मौन सोडले असून खऱ्या अर्थाने ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

"दिघेंच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्ती, त्यांचा खरा वारसदार आज जिल्हाप्रमुख झाला. आकसाने कुणाच्या झुणका भाकर केंद्रावर कारवाई करू नका. आपापसात काही करायला लावू नका, याच शिवसैनिकांमुळे तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर पोहचलात. बाळासाहेब, दिघेसाहेब यांचे नाव घेता तसे काम करा. आम्ही शिवसेनेचे लोक आहोत, अतिरेक करू नका... जशास तसे उत्तर दिले जाईल", असा इशारा राजन विचारे यांनी दिला. केदार दिघे यांनीही एकनाथ शिंदे यांना, काकांच्या बाबतीत खरे काय घडले हे विलंब न लावता सांगा, असे आव्हान दिले.

राज्यातील शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठे बंड नुकतेच झाले. त्यामुळे, शिवसेना नेतृत्व हादरले असतानाच जिल्ह्यातील अनेक आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी यानी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मातोश्रीने हकालपट्टीचे अस्त्र उगारूनही सेनेतील गळती थांबत नव्हती. अखेर, रविवारी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुखपदी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे व उपनेतेपदी अनिता बिर्जे यांची वर्णी लावण्यात आली. या नियुक्त्या नंतर सोमवारी विचारे व केदार दिघे समर्थकांनी दिवंगत दिघे यांच्या शक्तीस्थळावर आणि टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. यावेळी अनेक जुन्या शिवसैनिकांसह काही माजी नगरसेवकही उपस्थित असल्याचे दिसून आले. यावेळी आजपासून दिघे साहेबांचे सैनिक कामाला लागल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता प्रतिआव्हान दिले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाthaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे