शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उबेरचालकाच्या मृतदेहाचा लागला थांगपत्ता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:46 IST

कल्याण : कारचोरीच्या उद्देशाने उबेरचालकाची हत्या करून त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी कसारा घाटात फेकल्याची घटना ९ ऑगस्टला उघडकीस ...

कल्याण : कारचोरीच्या उद्देशाने उबेरचालकाची हत्या करून त्याचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी कसारा घाटात फेकल्याची घटना ९ ऑगस्टला उघडकीस आली होती. परंतु, चालकाचा मृतदेह सापडला नव्हता. दरम्यान, याप्रकरणातील सहा पैकी तीन आरोपींना बेड्या ठोकताना मृतदेहाचा थांगपत्ता लावण्यात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांना यश आले आहे. तर, उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू असून, अटक आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

उबेरचालकाची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यावर राहुलकुमार गौतम, धर्मेंद्रकुमार उर्फ वकील संपतराम गौतम, हरीश्चंद्र उर्फ अमन रमाकांत गौतम, करणकुमार विनोद गौतम, अमन हरीश्चंद्र गौतम, बचईकुमार गौतम (सर्व रा. उत्तर प्रदेश) आदी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. कारचोरीचा बेत सहा आरोपींपैकी राहुलकुमारने आखला होता. ते सर्व उत्तर प्रदेशहून एक्स्प्रेसने कल्याण रेल्वे स्थानकात उतरले. त्यानंतर उबेर कंपनीकडे कल्याण ते धुळे, अशा प्रवासासाठी कार बुक करण्यात आली. कारचा चालक अमृत गावडे (रा. नवी मुंबई) हा कार घेऊन कल्याणच्या शिवाजी चौकात रात्री ११.३० च्या सुमारास आल्यावर पाच जण या कारमध्ये बसले. कारने आग्रा रोडने प्रवास करत असताना त्यांनी कारचालकाचे अपहरण करीत त्याला ठार मारून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिला. त्यानंतर कारसह ते उत्तर प्रदेशला पसार झाले होते. यातील राहुलकुमार, धर्मेंद्रकुमार आणि गॅरेजचालक अमन अशा तिघांना अटक केली आहे.

-------------

फास्ट टॅगमुळे आरोपींचा लागला माग

कसारा येथून कार उत्तर प्रदेशला पळवून नेत असताना कारवर लावलेल्या फास्ट टॅगमुळे रस्त्यातील टोल नाक्यांवर उबेर कंपनीच्या खात्यातील पैसे कट होत होते. याची माहिती उबेर कंपनीकडून पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार त्या मार्गावरून टोलनाके तपासले असता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही कार दिसून आली होती. अखेर माग काढीत आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आणि तीन आरोपी पकडले गेले.

------------------------------------------------------------------