शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

खाडीत पाइप टाकून रस्ता बांधण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:30 IST

भाईंदर पालिका : आराखड्यात समावेशच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा राेड :  मीरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात पेणकरपाड्यातील खोडियार चाळीपासून दहिसरच्या एन.एल. संकुलास जोडणारा रस्ता नसतानाही पालिकेने खाडीपात्रात चक्क पाइप टाकून रस्ता बांधण्याचा प्रकार उघड झाला आहे.दहिसर व मीरा रोड दरम्यान असलेल्या जाफरी खाडीचे पात्र व परिसर विस्तीर्ण असून कांदळवन आहे. पेणकरपाड्यातील सरकारी जागेत तसेच पालिकेच्या उद्यानाच्या आरक्षणात झालेल्या खोडियार चाळींच्या जवळ ते खाडीपात्र ओलांडून पलीकडे मुंबईच्या हद्दीतील दहिसरच्या एन.एल. कॉम्प्लेक्सला जोडणारा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव पालिकेने केला. त्यासाठी चक्क खाडीच्या प्रवाहात पाइप टाकून त्यावर भराव करून रस्ता बांधण्याचे १९ लाखांचे कंत्राट पालिकेने गजानन कन्स्ट्रक्शनला दिले आहे. महापौर ज्योत्स्ना हसनाळे व भाजप नगरसेवकांनी त्याचे भूमिपूजनही केले होते.या कंत्राटदारानेही खाडी पात्रात पाइप टाकून त्यावर भराव केला आहे. परंतु रस्ता बांधून अजून तो मुंबईला जोडण्याचे काम थांबले आहे. वास्तविक मीरा-भाईंदर शहराच्या मंजूर विकास आराखड्यात असा रस्ताच नाही आहे. हा रस्ता झाल्यास पेणकरपाडा गावातून वाहनांची वर्दळ वाढून कोंडी होणार आहे. पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगर, जंगलातून येणारे पाणी तसेच परिसरातील दहिसर व मीरा-भाईंदरच्या हद्दीतील पाणी याच खाडीपात्रातून पुढे जाते. याबाबत पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित, कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हा रस्ता विकास आराखड्यात नाही. रस्ता बांधल्यास पेणकरपाडा गावात प्रचंड वाहतूककोंडी होईल. शिवाय खाडीपात्रात पाइप टाकून भराव केल्यास पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होईल. त्यामुळे या रस्त्यास आपण विरोध केला असून प्रभाग समितीच्या बैठकीत हे काम बंद केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.    - सोमनाथ पवार, प्रभाग समिती सदस्य