बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या क्षेत्रातील पूर्वेकडील कात्रप भागातील भुयारी गटारात गुरुवारी साफसफाईसाठी उतरलेल्या दोन कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. दुपारी साडेतीनच्या सुमारास कात्रप विद्यालयासमोरील भुयारी गटारात साफसफाईसाठी राजेश मांझी व सुरेंद्र सोनकर हे दोन कामगार उतरले होते. त्या वेळी तोल गेल्याने राजेश आत पडला. त्याला दोरीने बाहेर ओढण्याचा प्रयत्न करीत असताना सुरेंद्रही आत पडला. आतील विषारी वायूंमुळे दोघेही गुदमरले. त्यांना तातडीने बाहेर काढून बदलापूर ग्रामीण रुग्णालयात नेले, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्काय वे सुपर इन्फ्रा कंपनीच्या या कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून न दिल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप होत आहे. (प्रतिनिधी)
भुयारी गटारात गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू
By admin | Updated: December 23, 2016 03:12 IST