शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात टीएमटीच्या धक्क्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; चालकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 05:51 IST

विवियाना मॉल समोरील घटना, बसच्या डाव्या बाजूचा धक्का यादव यांच्या स्कूटरला लागला

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) एका बसचा धक्का लागल्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या संजय यादव (३५, रा. बिरबल चाळ, वीर सावरकरनगर, ठाणे) यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी टीएमटी चालक भास्कर दगडू साबळे (५३, रा. मुंबई) यांना राबोडी पोलिसांनी अटक  केली आहे. 

यादव हे आपल्या स्कूटरवरुन मुंबई -ठाणे पूर्व द्रूतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरुन विवीयाना मॉलसमोरुन जात होते. त्याचवेळी हिरानंदानी इस्टेट ते ठाणे रेल्वे स्थानक या मार्गावरील टीएमटी बसही मुंबईच्या दिशेने (ठाणे रेल्वे स्थानकाकडे ) जात होती. याच बसच्या डाव्या बाजूचा धक्का यादव यांच्या स्कूटरला लागला. त्यामुळे ते खाली रस्त्यावर पडले. याचदरम्यान या बसचे मागील चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी तातडीने एका रुग्णवाहिकेतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केल्याचे राबोडी पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी वाहतूक शाखेच्या पोलिसांसह राबोडी पोलीसही दाखल झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक  येवला यांनी टीएमटी चालक भास्कर  साबळे  याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. अपघातग्रस्त टीएमटी बसही ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.