शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

जिल्ह्यात दोन हजार ५८२ मुले शाळाबाह्य; सर्वेक्षणात झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:38 IST

२७५ शाळांतील बालकांची उपस्थिती अनियमित

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील शहरांमध्ये व ग्रामीण भागातील गावपाड्यांत दोन हजार ५८२ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. यामध्ये ४८ बालके शाळेत न गेलेले असून २७५ शाळांतील अनियमित बालके आहेत. तर, दोन हजार २५९ बालके स्थलांतरित होऊन जिल्ह्यात आल्याचे सर्वेक्षणाअंती उघड झाले आहे.शाळाबाह्य, अनियमित, स्थलांतरित मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शोधमोहीम घेण्यात आली. त्यादरम्यान जिल्ह्यात तब्बल दोन हजार ५८२ मुले शाळाबाह्य असल्याचे निदर्शनात आले. यामध्ये अनियमित बालकांसह शाळेत न गेलेले आणि जिल्ह्याबाहेरून आलेल्या मुलांचा समावेश आहे. कामानिमित्त कामगार, मजूर हे प्रामुख्याने स्थलांतरीत होत असतात असे सांगण्यात आले.जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांत गेली एक हजार ५३४ बालकेजिल्ह्यात अन्य जिल्ह्यांतून स्थलांतरित होऊन आलेल्या दोन हजार २५९ बालकांपैकी जिल्हांतर्गत ९६८ बालके आहेत. उर्वरित जिल्ह्याबाहेरील एक हजार दोन बालके आहेत. तर, राज्याबाहेरील २८९ बालके असून विशेष गरजाधिष्ठित दोन बालकांचा समावेश आहे. या स्थलांतरित होऊन आलेल्या बालकांप्रमाणेच जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांत गेलेली एक हजार ५३४ बालके आहेत. यामध्ये जिल्हांतर्गत एक हजार ९१ बालके आहेत. जिल्ह्याबाहेरची २१५ बालके असून राज्याच्या बाहेर गेलेली २२८ बालके आहेत. तर, विशेष गरजाधिष्ठित पाच बालकांची सर्वेक्षणात नोंद घेतली आहेत.३१९ जणांना प्रवेश दिल्याचा दावाजिल्ह्यातील ३२३ शाळाबाह्य बालकांपैकी ३१९ बालकांना नजीकच्या शाळेत प्रवेश दिल्याचा दावा प्राथमिक शिक्षण विभागाने केला आहे. उर्वरित चार बालके पुन्हा जिल्ह्याबाहेर स्थलांतरित झाल्याचे अहवालावरून दिसून येत आहे.

टॅग्स :Educationशिक्षण