शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

‘त्या’ दोन बहिणींच्या आत्महत्येचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2016 01:49 IST

सागर्लीतील इंद्राबाई कांबळे (५०) आणि लकावा कांबळे (४५) या दोघा बहिणींनी तीन दिवसांपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे

आकाश गायकवाड,  डोंबिवलीसागर्लीतील इंद्राबाई कांबळे (५०) आणि लकावा कांबळे (४५) या दोघा बहिणींनी तीन दिवसांपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे पोलीस व त्यांचा भाऊही बुचकळ्यात पडला आहे. दरम्यान, चार दिवसांत त्यांच्या घरी नातेवाईक तसेच कोणीच कसे फिरकले नाही, याचा पोलीस शोध घेत आहेत.सागर्ली गावातील शंभू गावदेवीनगर चाळीत कांबळे कुटुंबीय पूर्वी राहत होते. रामा कांबळे हे त्यांची पत्नी लक्ष्मी, मोठी मुलगी इंद्राबाई, लकावा व लहान भाऊ लखाप्पा यांच्यासह राहत होते. ते कल्याण-डोंबिवली महापालिकेत कामाला होते. लखाप्पा हा १० वर्षांचा असताना लक्ष्मी यांचे निधन झाले. त्यामुळे रामा यांच्यावर घरातील सर्व जबाबदारी पडली. २००४ मध्ये त्यांचे अचानक निधन झाले. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी इंद्राबाई व लकावा यांनी स्वीकारली. लखाप्पा लहान असल्याने दोघा बहिणींनी स्वत: शाळेत न जाता घरकाम करून त्याला वाढवले. त्याला नववीपर्यंत शिकवले. त्यामुळे बहिणींनी विवाहही केला नाही. लखाप्पा मोठा झाल्यावर टेम्पोचालक म्हणून काम करून बहिणींना मदत करू लागला. बहिणींनी २००५ मध्ये त्याचा सुषमाशी विवाह लावून दिला. तसेच त्यांनी त्याला श्री समर्थ कृपा बिल्डिंगमध्ये भाड्याने घर घेऊन दिले. त्या स्वत:च्या जानकी दत्तू अपार्टमेंटमध्ये वेगळ्या राहू लागल्या. त्या धुणीभांडी करून स्वत:चे पोट भरत होत्या. तसेच भावाच्या संसारालाही गरज भासेल, तेव्हा हातभार लावत होत्या.लखाप्पाला विनय नावाचा मुलगा आहे. त्या त्याचेही खूप लाड करीत होत्या. लखाप्पा त्यांच्याकडे दोन-तीन दिवस जाऊनयेऊन असायचा. बहिणीही भाऊ, भावजय व भाच्याला नेहमी भेटत असत. मागील आठवड्यात लखाप्पा त्यांच्याकडे जाऊन नाश्ता करून आला होता.