शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर नेवाळीतील दोन शाळेकरी मुलाचा रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू; नागरिकांचा रस्ता रोखो

By सदानंद नाईक | Updated: March 23, 2023 19:16 IST

सदानंद नाईक  उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी डावलपाडा येथे एमआयडीसीने खोदलेल्या खड्ड्यात बुधवारी दुपारी ७ व ८ ...

सदानंद नाईक उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी डावलपाडा येथे एमआयडीसीने खोदलेल्या खड्ड्यात बुधवारी दुपारी ७ व ८ वयोगटातील शाळेकरी दोन मुलांचा पडून मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईक व नागरिकांनी रस्ता रोखो आंदोलन करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

 उल्हासनगर शेजारील नेवाळीगाव डावलपाडा या परिसरात एमआयडीसीने जलवाहिनी दुरुस्तीसाठी रस्त्या लगत खड्डा खोदण्यात आला. मात्र गेले काही दिवस काम बंद असल्याने, पाण्याने भरलेल्या खड्ड्या भोवती सुरक्षेचा उपाय म्हणून ठेकेदाराने बॅरिकेट्स लावने गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुधवारी दुपारी ८ वर्षाचा सनी प्रमोद यादव व ७ वर्षाचा सुरज मनोज राजभर हे खेळत असतांना पाण्यात पडले. दरम्यान दोघेही मुले दिसत नसल्याने, नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता, खड्ड्यात मुले पडल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी संशय व्यक्त केला. खड्ड्यात शोध घेतला असता दोघांचाही मृतदेह आढळले.

 याप्रकारने मृत शाळेकरी मुलांचे नातेवाईक व नागरिक संतप्त होऊन शेजारी मुख्य रस्तावर रस्तारोखो आंदोलन करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. घटनेची माहिती मिळाल्यावर हिललाईन पोलिसांनी धाव घेऊन मुलाचे मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविले. तसेच पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला. याप्रकारने नेवाळी डावलपाडा येथे शोककळा पसरून ठेकेदारावर गुन्हा दाखल करीत नाही, तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका सुरवातीला नागरिकांनी घेतल्याने, वातावरण तणावग्रस्त झाले होते. अखेर पोलिसांच्या आश्वासनानंतर मुलावर गुरवारी अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेulhasnagarउल्हासनगर