शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हत्येप्रकरणी दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 20:11 IST

एका खाजगी गाडीच्या चालकाची गोळया घालून हत्या केली. त्यानंतर त्याची गाडी घेऊन बिल्डर व त्याच्या चालकावर गोळीवार करुन जखमी केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मरेर्पयत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

कल्याण-एका खाजगी गाडीच्या चालकाची गोळया घालून हत्या केली. त्यानंतर त्याची गाडी घेऊन बिल्डर व त्याच्या चालकावर गोळीवार करुन जखमी केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मरेर्पयत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा निकाल कल्याण जिल्हा सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी दिला आहे. या प्रकरणात सरकारी वकील दिलीप भांगरे यांच्यासह पोलिस अधिकारी पी. व्ही. मानकर, एस. बी. कुटे आणि एन. आर. हेमन यांनी कामकाज पाहिले. संजय खडकबहादूर दुबे हा बदलापूरमधील अनिल दरगड या बिल्डरकडे कामाला होता. काही कारणास्तव दरगड यानी संजयला कामावरुन काढून टाकले. या गोष्टीचा राग संजयच्या मनात होता. बिल्डरला धडा शिकविण्याच्या उद्देशाने संजयने त्याचा मित्र जवाहर कपिल मोर्या याच्या मदतीने 21 फेब्रुवारी 2010 रोजी अनिल वालवे याची खाजगी ट्रॅव्हल्सची गाडी बुक केली. या गाडीचा चालक राजेंद्र बनसोडे होते. या गाडीच्या चालकाला नेरुळ परिसरात गोळ्य़ा घालून जीवे ठार मारले. त्याच्या ताब्यातील झायलो गाडी घेऊन अनिल दरगड याच्या गाडीचा पाठलाग सुरु केला. मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा पाठलाग सुरु असल्याचे कळताच गाडीतील बिल्डरवर संजय व जवाहर या दोघांनी गोळीबार केला. या गोळीबारातून कसाबसा बचाव करीत दरगड हे रस्त्यालगत असलेल्या झाडी झुडपात पळून गेले. मात्र संजय व जवाहर यांनी दरगड यांच्या चालकावर गोळीबार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेतून दरगड यांचा चालक बचावला. या घटने प्रकरणी कुळगाव बदलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी संजय व जवाहरला अटक केली. त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणी कल्याण न्यायालयात हा खटला सुरु होता. त्याचा अंतिम निकाल आज लागला. न्यायालयाने दोन्ही आरोपींना हत्ये प्रकरणी मरेर्पयत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.