शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांत ठाण्यात दीड हजार जणांना श्वानदंश

By admin | Updated: June 19, 2017 04:58 IST

ठाणे जिल्ह्यात दोन महिन्यांत श्वानांनी तब्बल १ हजार ५२९ जणांचे लचके तोडले आहेत. तसेच मागील वर्षभरात जिल्ह्यात २ हजार १५५ जणांना श्वानदंश झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्यात दोन महिन्यांत श्वानांनी तब्बल १ हजार ५२९ जणांचे लचके तोडले आहेत. तसेच मागील वर्षभरात जिल्ह्यात २ हजार १५५ जणांना श्वानदंश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात भटक्या श्वानांची दहशत वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसत आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात तब्बल ८०२, तर मे महिन्यात ७०२ जणांना श्वानदंश झाला असून सरासरी दिवसाला २५ जणांचे श्वानांनी लचके तोडल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात दिवसेंदिवस भटक्या श्वानांची समस्या बिकट होत चालली आहे. त्यातच शहराचा वाढता विस्तार आणि जागोजागी होणारा कचरा तसेच गल्लीबोळातील चायनीज गाड्यांमुळे श्वानांना खाण्यास मिळत आहे. तसेच श्वानांमुळे अस्वच्छता पसरू लागली आहे. त्यातून भटके श्वान मोटारसायकलवरून येजा करणाऱ्यांचा पाठलाग करताना शहरी भागासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. या श्वानांमुळे चावा घेतल्याने जखमी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. दरम्यान, २०१५ या वर्षभरात ६ हजार ७२२ जणांना श्वानदंश झाला आहे. त्या वर्षातील डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ७९९ जणांना श्वानदंश झाला होता. त्यापाठोपाठ मार्च ६९४, नोव्हेंबर ६३३ आणि जानेवारी ६३० जणांना श्वानदंश झाल्याचे समोर आले आहे. तसेच २०१६ या वर्षात जानेवारीत सर्वाधिक १ हजार ४८१ जणांना तसेच फेब्रुवारी ते मे महिन्यात सरासरी ५०० जणांना श्वानदंश झाला आहे. जूनमध्ये ४११, तर जुलै महिन्यात २३३ जणांना श्वानांनी आपले लक्ष्य केले होते. त्यानुसार, एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत तब्बल दोन हजार १५५ जणांचे श्वानांनी लचके तोडले आहेत. एप्रिल २०१७ या एका महिन्यात ८०२, तर मे महिन्यात ७२७ जणांना श्वानांनी दंश केल्याची नोंद ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाने दिली.