शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू, उल्हासनगरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2023 12:09 IST

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: कॅम्प नंबर ३ मोहटा देवी येथील महापालिका आरोग्य केंद्रात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारी उघड झाला. मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण लवकरच उघड होईल, अशी माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.

उल्हासनगर कॅम्प नंबर ३, मीनाताई ठाकरे नगर येथील काजल कुंदन सावंत ही भक्ती या दाेन महिन्यांच्या मुलीला घेऊन नियमित लसीकरणासाठी मोहटा देवी येथील महापालिका आरोग्य केंद्रात मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता आली होती. लसीकरण झाल्यानंतर, ताप आल्यास तापाच्या गोळ्या कशा घ्यायच्या याबाबतची माहिती आशा वर्करने तिला दिली. हसत्या खेळत्या भक्तीला घरी गेल्यावर तापाची गोळी दिली आणि तिची तब्येत बिघडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

बुधवारी सकाळी भक्तीला मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले असता, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. मात्र, डॉक्टरांच्या शब्दावर विश्वास न ठेवता नातेवाईकांनी मुलीला खासगी रुग्णालयात नेले. तेथेही मुलीला मृत घोषित केल्यावर पुन्हा मध्यवर्ती रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी कारवाईची मागणी केली आहे.

ओठ काळे पडले, दातखीळ बसली

  • मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांच्या आदेशानुसार संबंधित डॉक्टरांनी झालेल्या प्रकाराची माहिती मध्यवर्ती पोलिस ठाण्याला दिली. 
  • मुलीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी मुलीचा मृतदेह फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी व शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
  • पोलिस पंचनाम्यात मुलीचे ओठ काळे पडले असून, मुलीची दातखीळ बसल्याचे नमूद केले आहे. तसेच दोन्ही पायांना इंजेक्शन दिल्याच्या खुणा आहेत, मात्र मारहाणीच्या खुणा नसल्याचे समोर आले आहे. 

लसीकरण झालेली इतर मुले ठणठणीत

  • महापालिकेच्या मोहटा देवी येथील आरोग्य केंद्रात मृत भक्ती कुंदन सावंत या मुलीसह इतर मुलांचेही लसीकरण झाले. 
  • मात्र, बाकीच्या मुलांची तब्येत ठणठणीत असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी अनिता सपकाळे यांनी दिली.
  • लसीकरणानंतर रात्री मुलीच्या तब्येतीमधील घटनाक्रम समजल्यास मुलीच्या मृत्यूचे ठोस कारण सांगता येईल, असेही त्यांनी सांगितले.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर