शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

डम्परच्या धडकेत दोन मजूर ठार; सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:31 IST

हे सर्व मजूर सायंकाळी चहा पिण्यासाठी चमन हॉटेलच्या बाहेर असलेल्या बाकड्यावर बसलेले होते.

भिवंडी : महापालिकेच्या रामनगर चाविंद्रा येथील डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकून परतणाऱ्या डंपरचे ब्रेक चमन हॉटेलसमोर फेल झाल्याने झालेल्या अपघातात मंगळवारी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले. शब्बीर उर्फ राजू खान (४०) व अहमद हारून मोमीन (३२) अशी मृतांची नावे आहेत, तर समीन खान (४५) , रामकुमार मौर्य (४०),साजिद अली (२७), जमाल शेख (२७), मझहर खान (५६) गुफरान अंसारी (२४) अशी अपघातात जखमी झालेल्या मजूरांची नांवे आहेत.

हे सर्व मजूर सायंकाळी चहा पिण्यासाठी चमन हॉटेलच्या बाहेर असलेल्या बाकड्यावर बसलेले होते. त्यावेळी महापालिकेचा कचरा वाहतूक करणारा डंपर क्र .एमएच - ०४ - डीडी -८४४३ हा डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकून उतारावरून परतत असताना डंपरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने डंपर थेट हॉटेलच्या भिंतीवर जाऊन आदळला. यावेळी बाकड्यावर बसलेले दोन मजूर जागीच ठार झाले. यातील जखमींपैकी जमाल शेख व मझहर खान या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

समीन, साजिद व रामकुमार या तिघांना उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले आहे तर गुफरान याच्यावर खाजगी रु ग्णालयात उपचार करून त्यास घरी सोडण्यात आले आहे. या अपघातानंतर डंपर चालक फरार झाला असून रात्री उशिरा डंपर चालकाच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.कारवाईची मागणीच्अधिकारी, ठेकेदाराच्या संगनमताने कचरा वाहतुकीसाठी मुदतबाह्य वाहने वापरली जातात. बहुतांश वाहनांचे पासिंग झालेले नसते. काही चालकांकडे ड्रायव्हींग लायसन्स नाही. अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे अनंता पाटील यांनी केली.