शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी मागणाऱ्या दोन पत्रकारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:51 IST

भिवंडी पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याकडे ६५ लाखांची खंडणी मागणाºया दोन पत्रकारांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली.

ठाणे : भिवंडी पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याकडे ६५ लाखांची खंडणी मागणा-या दोन पत्रकारांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. आरोपींनी माहिती अधिकाराचा दुरुपयोग करून बदनामीची धमकी दिली होती.भिवंडी पंचायत समितीचे शाखा अभियंता दत्तू गिते यांच्याकडे उपअभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. भिवंडी येथील साप्ताहिक शब्ददूतचा संपादक रंगनाथ हरिभाऊ तांगडी आणि ठाण्यातील साप्ताहिक भाग्यदूतचा संपादक पांडुरंग बाबूराव बेनके यांनी फेब्रुवारी २०१७ पासून माहिती अधिकाराचा वापर करून गिते यांची कार्यालयीन आणि वैयक्तिक माहिती मागवली. माहिती अधिकाराचे अर्ज मागे घेण्यासाठी तांगडी याने ४० लाख, तर बेनके याने २५ लाखांची खंडणी मागितली होती. त्यांनी गिते यांच्याविरुद्ध बातम्याही प्रसिद्ध केल्या. दीड लाखांची खंडणी घेऊनही तांगडीने गिते यांच्याकडे पुन्हा ४० लाख रुपयांची मागणी केली. ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहासमोर पैसे आणण्यास सांगितले.गिते यांनी ही माहिती खंडणीविरोधी पथकाला दिली. त्यानुसार या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार यांनी तांगडेला रंगेहाथ अटक केली. बेनकेचाही यात सहभाग असल्याने त्यालाही अटक केली. दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.>खंडणीखोर व्यावसायिक गजाआडठाणे : कळव्यातील दुकानदारांकडून खंडणी उकळणाºया व्यावसायिकास खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी रात्री अटक केली. या दुकानांच्या वाढीव बांधकामाची तक्रार आरोपीने महापालिकेकडे केली होती. कळवा येथील नारायण लोकय्या सुवर्णा हे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांचे कळवा येथे श्रद्धाज किचन नावाचे हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलच्या रांगेत आणखी काही दुकाने आहेत. या दुकानदारांनी त्यांच्या दुकानांसमोर वाढीव शेडचे बांधकाम केले आहे. त्याविरोधात कॅटरिंगचा व्यवसाय करणारा कळव्यातील सुनील बबन साळुंके याने तक्रार केली होती. ती मागे घेण्यासाठी त्याने दुकानदारांकडे १० लाखांची खंडणी मागितली होती.

टॅग्स :Arrestअटक