शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर घरतच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 06:13 IST

केडीएमसीचा अतिरिक्त आयुक्त लाचखोर संजय घरत आणि अन्य दोघांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

कल्याण : केडीएमसीचा अतिरिक्त आयुक्त लाचखोर संजय घरत आणि अन्य दोघांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. घरत हा तपासकामात सहकार्य करत नसल्याची माहिती रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात देण्यात आली. यावर पोलीस कोठडी वाढवण्यात यावी, अशी विनंती तपास अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. ही विनंती जिल्हा सत्र न्यायाधीश एन.एम. वाघमारे यांनी मान्य करत तपासकामी आणखीन दोन दिवसांची कोठडी सुनावली.अतिरिक्त आयुक्त घरत याला बुधवारी आठ लाखांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अटक करण्यात आली. त्याच्यासह ललित आमरे आणि भूषण पाटील या लिपिकांनादेखील अटक केली आहे. तिघांना गुरुवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता घरत हा तपासकामात सहकार्य करत नसल्याचे सांगण्यात आले. घरत हा त्याच्याकडील दोन मोबाइलमधील पासवर्डची माहिती देत नसल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले होते. संबंधित अधिकाºयांनी तपासकामी जास्तीतजास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी केली असता आरोपींना त्यावेळी तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती.या प्रकरणात नारायण परुळेकर या आणखी एकाला अटक करण्यात आली होती; परंतु त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, रविवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिघांना पुन्हा कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायाधीश एन.एम. वाघमारे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी घरत हा तपासकामात सहकार्य करत नसल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त दीपक दळवी यांच्या वतीने पुन्हा सांगण्यात आले. घरत याच्याजवळील दोन मोबाइलचे पासवर्ड त्याच्याकडून सांगितले जात नसल्याकडेही दळवी यांनी लक्ष वेधले.>त्या मोबाइलमध्ये दडलेय काय?घरत याच्यासह अन्य दोघांना अटक करून पाच दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. परंतु, आतापर्यंत झालेल्या तपासकामातून कोणतीही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आलेली नाही. अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर तपासकामात सहकार्य केले जात नसल्याकडे लक्ष वेधत घरतच्या मोबाइल पासवर्डचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.