शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

आक्षेपांवर दोन दिवसांची सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:42 IST

राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँकांमध्ये एकमेव श्रीमंत बँक म्हणून या टीडीसी बँकेचा गवगवा आहे. या बँकेच्या २१ सदस्यांसाठी ३० मार्चला मतदान आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : तब्बल साडेदहा हजार कोटींची वार्षिक उलाढाल ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेची आहे. या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांचे प्रस्ताव विभागीय सहकारी संस्था सहनिबंधकांनी मागितले असता तब्बल तीन हजार मतदार संस्थांच्या यादीचे प्रस्ताव शेवटच्या दिवसापर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यामधील विविध त्रुटींच्या दुरुस्तीसाठी संबंधितांनी ५९ हरकती दाखल केल्या आहेत. त्यावर १० व ११ फेब्रुवारी या दोन दिवसांच्या कालावधीत सुनावणी घेतली जाईल, असे विभागीय सहनिबंधक अप्पाराव घोलकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँकांमध्ये एकमेव श्रीमंत बँक म्हणून या टीडीसी बँकेचा गवगवा आहे. या बँकेच्या २१ सदस्यांसाठी ३० मार्चला मतदान आहे. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आधीपासूनच सुरू झाली. आतापर्यंत सहकारी संस्था, पतसंस्था आदी मतदार असलेल्या संस्थांकडून मतदार यादींचे प्रस्ताव घेऊन त्यावरील आक्षेपांवर सुनावणीची प्रक्रिया आता आहे. मतदारयादीतील संस्थेचे, मतदाराचे नाव चुकले असल्यास त्यांच्या दुरुस्तीसाठी संबंधितांनी ५९ हरकती घेतल्या आहेत. त्यांच्यावर बुधवारी आणि गुरुवारी सुनावणी पार पडणार आहे.या मतदानासाठी प्राथमिक यादीत तब्बल तीन हजार मतदार निश्चित झालेले आहेत. त्यांना या बँकेच्या २१ संचालकांना मतदार करावे लागणार आहे. या मतदारांची अंतिम यादी १६ फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. त्यानंतर इच्छुक उमेदवार २६ फेब्रुवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करतील. या प्राप्त उमेदवारी अर्जांची ५ मार्चला छाननी होऊन या बँकेच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी ८ मार्चला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराला रंग चढणार आहे. नव्या संचालकांकडे सर्वांचे लक्षयंदाही सर्वपक्षीय पॅनल तयार करून निवडणूक लढवणार असल्याचे बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. याआधीच्या विद्यमान २१ संचालकांपैकी अशोक पोहेकर, कृष्णा घोडा आणि वकील देविदास पाटील या तिन्ही संचालकांचे निधन झालेले आहे. त्यांच्या जागांसह उर्वरित मतदारसंघातून २१ नवीन संचालक बँकेवर कोण निवडून येणार त्यासाठी ३१ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.