शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोघा चेनस्रॅचरना संतप्त जमावाकडून बेदम चोप

By admin | Updated: July 13, 2015 03:21 IST

: ठाकुर्ली येथील रहिवासी नीलम चौधरी यांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या दुकलीला आज येथील नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलीसांच्या हवाली केले.

डोंबिवली : ठाकुर्ली येथील रहिवासी नीलम चौधरी यांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या दुकलीला आज येथील नागरिकांनी बेदम चोप देऊन पोलीसांच्या हवाली केले.पती स्वप्नील यांच्यासमवेत त्या दवाखान्यात जात असताना पल्सरवरूनआलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी त्यांचे मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र निलम यांनी मंगळसूत्र घट्ट पकडून ओरडण्यास सुरुवात केली. ते पाहताच अल्ताफ असार जाफरीन (१६) आणि कासीम जाफरहुसेन जाफरी यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, स्वप्नील यांच्यासह अन्य काहींनी त्या दोघांना खाली पाडून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी दु. ४.१५ च्या सुमारास घडली. त्या दोघांनाही उपचारार्थ डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौधरी यांनी यासंदर्भात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून त्यानुसार त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे रामनगर पोलिसांनी सांगितले. या दोघांवरही दरोड्याचा प्रयत्न, चोरीचा प्रयत्न, आणि ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणे, अशा कलमान्वये गुन्हा दाखल केला. परंतु, ते अल्पवयीन असल्याने तपासात अडथळा येऊ शकतो, अशीही चर्चा पोलीस वर्तुळात सुरू होती. सहायक पोलीस उपायुक्त कालिदास सूर्यवंशी, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आदींनी घटनास्थळी भेट दिली. तसेच त्या दोघांची इस्पितळात जाऊन चौकशी केली. सोमवारी त्यांच्यावर ज्युव्हेनाइल अ‍ॅक्टप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगितले. यापूर्वीही संतप्त जमावाने अशा चेनस्रॅचरला बेदम मारहाण करण्याची घटना घडली होती. तरीही हे प्रकार आटोक्यात येत नाहीत. ते वाढतच आहेत. यामुळे पोलीसही हाताश झाल्यासारखे वाटत आहेत. (प्रतिनिधी)