शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या छेडखानीचा जाब विचारणाऱ्या पतीला मारहाण केल्याच्या दोन घटना 

By धीरज परब | Updated: September 26, 2023 10:07 IST

महिलांची छेडखानी करून वर जाब विचारणाऱ्या पतीनाच मारहाणीच्या दोन घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे .

मीरारोड - पत्नीची छेडखानी करणाऱ्या भामट्याना जाब विचारणाऱ्या पतींना मारहाणीच्या घटना मीरा भाईंदर मध्ये घडल्या असून नवघर व नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत . 

मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्या नुसार भाईंदर मध्ये राहणारे फिर्यादी पती हे पत्नीसह रविवारी सायंकाळी एका हॉटेल मध्ये जेवणास गेले होते . त्यावेळी आरिफ नावाच्या व्यक्तीने पत्नीला कॉल करून माझ्या सोबत जेवणास येते का असे विचारले . त्यावर पतीने त्यास माझ्या पत्नी सोबत असे का बोलला ? असा जाब विचारून समज दिली . त्याचा राग धरून आरिफ याने एका मित्र व मैत्रीणीसह नया नगर भागात महिलेच्या पतीस गाठले. त्याला शिवीगाळ करत ठोश्या बुक्क्यांनी, पट्टा व गाडीने चावीने मारहाण करत जखमी केले . नया नगर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे . 

दुसरी घटना भाईंदर पूर्व भागात घडली आहे . एक महिला २३ सप्टेंबरच्या रात्री उशिरा घरी जात असताना एका व्यक्तीने तिच्या कंबरेला हाताने पकडले . तिने पतीला सदर प्रकार सांगितल्यावर तो जाब विचारण्यास गेला असता तिघा अनोळखी इसमांनी त्यास शिवीगाळ करून मारहाण केली . या बाबत रविवारी रात्री नवघर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे . या प्रकरणी सहायक फौजदार लक्ष्मण पाटील तपास करत आहेत . 

महिलांची छेडखानी करून वर जाब विचारणाऱ्या पतीनाच मारहाणीच्या दोन घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे . अशा रोडरोमियों वर कठोर कारवाईची मागणी होत आहे .