शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या दोन इमारती कोसळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:09 IST

महाराष्ट्रनगर भागात असलेल्या म्हाडाच्या दोन धोकादायक चार इमारती बुधवारी सकाळी अचानक कोसळल्या. या इमारती यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्याने कोणतीही

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महाराष्ट्रनगर भागात असलेल्या म्हाडाच्या दोन धोकादायक चार इमारती बुधवारी सकाळी अचानक कोसळल्या. या इमारती यापूर्वीच रिकाम्या करण्यात आल्याने कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव बाजूची इमारतदेखील रिकामी केली आहे. त्यामध्ये २० कुटुंबांना इतरत्र हलवण्यात आले आहे.डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मागील बाजूस महाराष्ट्रनगर परिसर आहे. या भागात सुमारे ४० वर्षांपूर्वी म्हाडाने १८ इमारती बांधल्या होत्या. त्यातील बहुतेक इमारती धोकादायक झाल्याने म्हाडाची ही संपूर्ण वसाहत पुनर्विकासासाठी विकासकाकडे देण्यात आली आहे. यातील बहुतांश इमारती धोकादायक झाल्याने त्या रिकाम्या केल्या आहेत. त्यातीलच ४ आणि ५ क्रमांकांच्या दोन इमारती बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास कोसळल्या. पण तेथे कोणी रहात नव्हते. पालिकेचा आपत्कालीन विभाग, अग्निशमन दल व म्हाडाच्या अधिकाऱ्यांनीदेखील घटनास्थळी जाऊन ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले. दरम्यान, म्हाडाच्या जुन्या झालेल्या १८ इमारतींचा पुनर्विकास होणार असल्याने तेथे राहणाऱ्या रहिवाशांना विकासकाने अन्यत्र जागा दिली होती. यातील काहींना भाडेदेखील दिले आहे. तरीही, सात खोल्या भाड्याने राहण्यासाठी दिल्या होत्या. तर, ११ खोल्यांमध्ये कुटुंबे होती. चार व पाच क्र मांकाची इमारत कोसळल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्या निवाऱ्याची इतरत्र व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे इमारत धोकादायक असूनही तेथे लोक कसे राहत होते, याची चौकशी म्हाडाचे अधिकारी करीत आहेत.