शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन सहायक आयुक्तांच्या बदल्या, अपर पोलीस आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 01:32 IST

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेषण विभागाचे मुकूंद हातोटे आणि बाजीराव भोसले या दोन सहायक पोलीस आयुक्तांसह १६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी शनिवारी काढले

जितेंद्र कालेकरठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेषण विभागाचे मुकूंद हातोटे आणि बाजीराव भोसले या दोन सहायक पोलीस आयुक्तांसह १६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी शनिवारी काढले. यामध्ये ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.ठाणे शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे (शोध -१) सहायक पोलीस आयुक्त हातोटे यांना याच विभागातील गुन्हे प्रतिबंधक शाखेत आणले आहे. तर प्रतिबंधक शाखेचे भोसले यांना आता शोध -१ मध्ये संधी देण्यात आली आहे. भोसले यांनी निरीक्षक आणि वरिष्ठ निरीक्षकपदी असतानाही मुंबई, ठाण्यात अनेक नामचीन गुंडांना जेरबंद करून अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघड केले आहेत. त्यांच्या याच अनुभवाचा शोध १ शाखेला चांगला उपयोग होणार आहे.ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांची डहाणू येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदोन्नतीवर बदली झाल्याने त्यांच्या जागी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांना आणण्यात आले आहे. टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी धुमाळ यांची ठाण्याच्या अतिक्रमण विभागात बदली झाली आहे.अंबरनाथचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण वाघ यांची जलद प्रतिसाद पथकात आणि कोनगावचे मंगेश सावंत यांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे. तर जितेंद्र आगरकर (बदलापूर), दिलीप गोडबोले (शिवाजीनगर) आणि सुरेंद्र शिरसाठ या तिघांना विशेष शाखेत आणण्यात आले आहे. गोडबोले यांच्या जागी आता शहर वाहतूक शाखेचे सुभाष कोकाटे यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक पदाची संधी देण्यात आली आहे.वर्तकनगर पोलीस ठाण्याचे रवीदत्त सावंत यांना शहर वाहतूक शाखेत तर मानपाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे यांना वर्तकनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली आहे. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या अनघा देशपांडे यांना ठाणेनगर आणि ठाणेनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश लांभाते यांना शहर वाहतूक शाखेत हजर व्हावे लागणार आहे.याशिवाय, संजय सावंत (गुन्हे शाखा) यांना टिळकनगर, अफजलखान पठाण (शीळ डायघर ) यांना मालेकर यांच्या जागी वागळे इस्टेट, काशिनाथ चव्हाण (विशेष शाखा) यांना अंबरनाथ आणि राजेंद्र कदम यांना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या असून सर्व निरीक्षकांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले आहेत.