शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या तरुणीसह दाेघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: August 1, 2024 23:41 IST

आठ तोळ्यांचे दागिने केले हस्तगत

ठाणे: महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या एका तरुणीसह अमाेल कानडे अशा दाेघांना ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून १३ गुन्हे उघड झाले. त्यातील १२ गुन्ह्यांतील आठ तोळे दागिन्यांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. महिलांचे दागिने चोरीसाठी ती रेल्वेस्थानकातील महिलांच्या मध्य भागातील डब्याची निवड करायची. तिच्या याच ‘एमओबी’मुळे ती पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अनेक दिवसांपासून ठाणे रेल्वेस्थानकात महिला प्रवाशांच्या डब्याजवळ महिलांचे मंगळसूत्र, सोनसाखळी चोरी होत असल्याच्या घटना वाढल्या होत्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी त्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक गणेश नावकार, पोलिस उपनिरीक्षक संजय मडव, हवालदार दत्तात्रय राठोड, हवालदार साक्षी सावंत, मीरजावेद नदाफ, राकेश गोसावी, हर्षद गायकवाड, नितीन सरवदे, अक्षय रणसिंग आणि अमोल मोरे यांचे विशेष पथक तयार करून गुन्ह्यांचा तपास सुरू केला हाेता. याच पथकाने फलाटांवरील सीसीटीव्ही तपासले. मात्र आरोपीचा ठाव-ठिकाणा लागत नव्हता. गेल्या २० दिवसांपासून हे पथक आरोपीला पकडण्यासाठी पाळत ठेवून होते. दुसारे यांच्यासह त्यांच्या पथकांनी चोरीच्या प्रकाराचा आणि घटनास्थळाचा आढावा घेतला. चाेरीचे प्रकार गर्दीच्या वेळी आणि महिलांच्या राखीव डब्यामध्ये चढताना किंवा उतरताना होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार या पथकाने पाळत ठेवून एका २६ वर्षीय तरुणीला दि. २५ जुलै २०२४ राेजी ताब्यात घेतले. तिला ‘बाेलते’ केल्यानंतर तिने सर्वच चाेऱ्यांचा घटनाक्रम सांगितला.

रेल्वे पोलिसांची कारवाईचाैकशीमध्ये पोलिसांनी तिच्याकडून पाच लाख चार हजार ३०० रुपयांचे ७७.२४० मिली ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले. तिच्याकडून एका प्रकरणाव्यतिरिक्त सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे. तिच्याच चाैकशीमध्ये तिने चाेरलेल्या दागिन्यांची विल्हेवाट लावणारा तिचा साथीदार अमाेल कानडे यालाही दि. ३१ जुलै राेजी अटक केली. गुन्हा करण्यासाठी ही महिला लोकलचा महिला राखीव मधला डबा निवडत असल्याचे लक्षात आल्याने त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवून या गुन्ह्याची उकल केल्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे