शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरण प्रकरणी आत्यासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 23:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आपल्याच नात्यातील सहा आणि सात वर्षीय दोन मुलींचे अपहरण करणाऱ्या सुफियाना उर्फ गौरी निसरु ...

ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलिसांची कामगिरी मुलींची १२ तासांमध्ये सुखरुप सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आपल्याच नात्यातील सहा आणि सात वर्षीय दोन मुलींचे अपहरण करणाऱ्या सुफियाना उर्फ गौरी निसरु ल्लाह उर्फ समिर शेख (२२) आणि तिचा साथीदार विजय गमरे (२२, रा. कापूरबावडी, ठाणे) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून या दोन्ही मुलींची सुखरुप सुटका केल्याचे पोलिसांनी सांगितले.वागळे इस्टेट, आंबेवाडी परिसरातील दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी वागळे इस्स्टेट पोलीस ठाण्यात ६ जानेवारी २०२१ रोजी दाखल केली होती. त्या दोघीही ५ जानेवारी रोजी आपल्या घरासमोर खेळत असतांना सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बेपत्ता झाल्या होत्या. परिसरातील सीसीटीव्हीतील चित्रण तसेच स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दतात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी. एस. निकुंभ, पोलीस हवालदार शिवाजी रावते, पोलीस नाईक सुनिल मोरे, संदीप थोरात, रोहन जाधव, एस. डी. सादये, पोलीस अंमलदार बरले आणि रत्नदीप शेलार आदींनी आरोपींचा शोध घेतला. तेंव्हा ठाण्यातील इंदीरानगर मार्केट परिसरात विजय गमरे घुटमळतांना आढळला. तो निघून जात असतांना या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. तेंव्हा यातील बेपत्ता दोन्ही मुली त्याच्या समवेत असलेल्या सुफियाना हिच्यासह त्याच परिसरामध्ये एका ठिकाणी असल्याचे सांगितले. या दोन्ही अपहरण झालेल्या मुलींचा अवघ्या १२ तासांमध्ये शोध घेण्यात पोलिसांना यश आले. दोघींनाही सुखरुपपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विजय आणि सुफियाना यांना ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं