शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्वानदंशाने अडीचवर्षीय बालक जखमी

By admin | Updated: April 25, 2016 03:02 IST

डोंबिवलीत श्वानदंशाच्या घटना सुरूच आहेत. कृष्णा चौधरी या अडीच वर्षांच्या बालकाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना शनिवारी गांधीनगर परिसरात घडली.

कल्याण : डोंबिवलीत श्वानदंशाच्या घटना सुरूच आहेत. कृष्णा चौधरी या अडीच वर्षांच्या बालकाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना शनिवारी गांधीनगर परिसरात घडली. बालकावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सातत्याने अशा घटना घडत असल्याने भटक्या श्वानांची दहशत वाढत आहे.कृष्णा हा गांधीनगर परिसरातील बाबुराव पाटील निवासमध्ये राहतो. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास त्याला श्वानदंश झाला. त्याच्या आजीआजोबांनी नजीकच्या डॉ. आनंद हर्डीकर यांच्या रुग्णालयात नेले होते. तेथे उपचार केल्यावर घरी सोडले. जानेवारीमध्ये नांदिवली गावातील संकेत म्हात्रे या सात वर्षांच्या मुलाचा श्वानदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. तर, १८ एप्रिलला याच परिसरातील दिव्या जुमडे या लहान मुलीला श्वानदंश झाल्याची घटना घडली होती. जखमी दिव्याला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार न मिळाल्याने तिला मुंबईला हलवण्यात आले. दरम्यान, श्वानदंश आणि त्यावरील औषधांचा मुद्दा नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत चांगलाच गाजला. शिवसेनेच्या सदस्या प्रेमा म्हात्रे यांनी महापालिकेच्या रुग्णालयात श्वानदंशावर औषधे उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांना जाब विचारला होता. यावर, रेबीज इंजेक्शन उपलब्ध आहे. परंतु, इमिनोग्लोबीन व्हॅक्सीन महागडे असल्याने ते नसल्याचे स्पष्टीकरण रोडे यांनी दिले होते. जीवापेक्षा औषध महाग नसल्याचे सुनावत सभापती संदीप गायकर यांनी तातडीने संबंधित व्हॅक्सीन खरेदी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. (प्रतिनिधी)