शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

चोवीस तासांत साकारली तब्बल ४१५ रेखाचित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:36 IST

दिनेश गुप्ता यांचा विक्रम : ‘लिम्का बुक आॅफ रेकार्ड’साठी प्रयत्न

जान्हवी मोर्ये।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : सलग २४ तासांत ४१५ रेखाचित्रे साकारून प्रा. दिनेश गुप्ता यांनी पेन्सिल आर्ट प्रकारात नवा विक्रम केला आहे. या विक्रमाची ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यासाठी गुप्ता प्रयत्न करत आहेत. सध्या पेन्सिल आर्ट या प्रकारात लिम्का बुकमध्ये एकही नोंद नसल्याने गुप्ता यांच्या विक्रमाची नोंद झाल्यास ही कामगिरी करणारे ते पहिलेच व्यक्ती ठरतील. लिम्का बुकमध्ये अ‍ॅक्रॅलिक रंगांत २४ तासांत २४० चित्रे काढण्याच्या विक्रमाची नोंद आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आर्ट गॅलरीमध्ये त्यांनी हे रेकॉर्ड केले आहे. ५ एप्रिलला त्यांनी हे रेकॉर्ड केले आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्रतिभा असते. त्या प्रतिभेला लोकाश्रय मिळावा, ही प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. याच उद्देशातून गुप्ता यांनी आपली कला लोकांसमोर सादर करून विक्रमाला गवसणी घातली आहे. या इव्हेंटला लिम्का बुक आॅफ रेकार्डने मान्यता दिली होती. गुप्ता यांनी २४ तासांत ४१५ रेखाचित्रे काढली. त्यामध्ये सभागृहात उपस्थित नागरिक, मान्यवरांचे चेहरे, महापुरुषांचे चेहरे, नेचर आर्ट, क्रिएटिव्ह आर्ट, मॉडर्न आर्ट, एब्स्ट्रॅक्ट आर्ट आणि विविध वस्तूंचा यामध्ये समावेश आहे. सर्व चित्रे सरल, सुबक, अद्भुत आहेत. ६बी पेन्सिलच्या साहाय्याने ए३ साइज ड्रॉइंग पेपरवर त्यांनी ही चित्रे काढली होती.

गुप्ता हे मेकॅनिकल इंजिनीअर असून नेरळच्या इंजिनीअरिंग महाविद्यालयात सहायक प्राध्यापक आहेत. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुनील वायले, केडीएमसी महापौर विनीता राणे, माजी आमदार प्रकाश भोईर आदी उपस्थित होते.कविता लिहिण्याचाही छंद : काही वर्षांपासून हिंदी, मराठी, इंग्रजीमध्ये लेख आणि कविता लिहिण्याचा छंदही ते वेगवेगळ्या माध्यमातून जोपासत आहेत. सलग १२ तास अव्याहृतपणे कविता लिहून त्यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली होती. त्याची ‘गोल्डन बुक आॅफ रेकार्ड’मध्ये नोंद झाली होती. लोकांशी परिचय वाढविणे, पेंटिंग बनविणे, गाणी म्हणणे, नवीन भाषा शिकणे, फोटोग्राफी आदी छंद त्यांनी जोपासले आहेत.