शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाताला बाराशे, नागली, वरई चार हजार; भाव गडगडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 10:27 IST

- जनार्दन भेरे  लोकमत न्यूज नेटवर्क  भातसानगर : शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांना अतिवृष्टीचा, तर रब्बीतील पिकांना अतिवृष्टीबरोबरच गारपिटीचा मोठा फटका ...

- जनार्दन भेरे लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांना अतिवृष्टीचा, तर रब्बीतील पिकांना अतिवृष्टीबरोबरच गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून बाजारात  तांदूळ, ज्वारी, बाजरीच्या भावात वाढ झाली आहे. भाताला  एक हजार ते १२०० रुपये, नागलीला ४ हजार १०० रुपये, तर वरई ४ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळत आहे.

खरीप हंगामातील भात, नागली, वरई यांना चांगला  भाव मिळत नाही. शेवटी शेतकऱ्यांना अर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मिळेल त्या भावात शेतमालाची विक्री करावी लागते. आता हंगाम संपल्यानंतर पावसाळ्यात नांगरणीबरोबरच भात बियाण्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या शेतमालाची मागणी बाजारात वाढली आहे. परंतु, आवक घटल्याने मिळेल त्या किमतीला शेतकऱ्यांना भात  विकावा लागत आहे.

भाताला सर्वाधिक भावभाताला सर्वाधिक भाव भात खरेदी केंद्राकडून मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या भात खरेदी करत नसल्याने व शासकीय भात खरेदी केंद्र बंद झाल्याने खासगी दुकानदार आता अधिक कमी भावाने भात खरेदी करू लागले आहेत. भात १ हजार २०० रुपयांना विकला जात आहे.

भाव आणखी गडगडणार     खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे भात भिजल्याने मोठी घट झाली आहे. त्यामुळे  मागणी वाढली आहे. हा भाव हजार रुपये ते तेराशे क्विंटलवर जाऊन स्थिर राहण्याची शक्यता आहे.     खरीप व रब्बी हंगामातील अवकाळी अतिवृष्टीने   उत्पादनात घट झाली. त्यामुळे सध्या बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे आवश्यक भावात वाढ झाली आहे. नवीन भात बाजारात येईपर्यंत भावात चढउतार राहण्याची शक्यता आहे. किंवा अजूनही भाताचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

भाताचे उत्पादन जास्त झालेल्या शेतकऱ्यांनी सध्या भाताची विक्री सुरू केली आहे. सध्या बाजारात भात, नागली, बाजरीची आवक जास्त असल्याचे दिसून येते.    -योगेश सोळंकी, कृषी पर्यवेक्षक.

शेतकऱ्यांनी भाव कमी असल्याने भाताची विक्री करण्याऐवजी बियाणे म्हणून घरात ठेवले आहे.    - प्रवीण भेरे, शेतकरी.