शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

विद्यार्थ्यांसोबतच आता पालकांचीही घेणार शिकवणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 03:23 IST

अनेक पालक आपल्या पाल्याला खाजगी शिकवणीत पाठवतात. त्या शिकवणीची फी भरणे सगळ्यांनाच परवडत नाही.

- स्नेहा पावसकरठाणे : अनेक पालक आपल्या पाल्याला खाजगी शिकवणीत पाठवतात. त्या शिकवणीची फी भरणे सगळ्यांनाच परवडत नाही. त्यासाठी पालक दुप्पट मेहनत करून मुलांना शिकवणीत प्रवेश घेतात. मध्यमवर्गीय पालकांची हीच परवड थांबवण्याच्या दृष्टीने सरस्वती मंदिर ट्रस्टने यंदा शिकवणीमुक्त शाळा अभियान हाती घेतले आहे. या अभियानादरम्यान इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सरस्वती विद्यासंकुलातच विनामूल्य शिकवणी सुरू करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा, यादृष्टीने पालकांचीही शिकवणी घेतली जाणार आहे.बहुतांशी शाळांमधील सुमारे ९० टक्के विद्यार्थी खाजगी शिकवणीत जातात. अगदी शिशुवर्गातील मुलेही शिकवणीत दिसतात. त्याची कारणे वेगवेगळी असतात. काही पालकांना योग्य तितके ज्ञान नसते. काहींना मुलांसाठी वेळ नसतो. काहींच्या वस्तीमधील वातावरण अभ्यासाला पोषक नसते, तर इतर मुले जातात म्हणूनही काही पालक मुलांना शिकवणीमध्ये पाठवतात. त्यातच खाजगी शिकवण्यांची फी वर्षागणिक वाढते आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांचे आर्थिक गणित कोलमडते. आपल्या शाळेतील बहुतांशी विद्यार्थीसुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, हे लक्षात घेत सरस्वती मंदिर ट्रस्टने शिकवणीमुक्त शाळा अभियान हाती घेतले आहे. या अभियानादरम्यान सुरुवातीला पहिली ते चौथी इयत्तेतील इच्छुक विद्यार्थ्यांची शाळेतील निवडक शिक्षक हे शाळेतच शिकवणी घेणार आहेत. शाळा सुटल्यावर किंवा आठवड्यातून शनिवार-रविवारी हे शिकवणीचे वर्ग घेतले जातील.इच्छुक पालकांनी नाोंदणी केल्यावर जुलै महिन्यापासूनच हे अभियान सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली.>घरच्या घरी अभ्यास घेण्याच्या क्लृप्त्या शिकवणारबदलत्या अभ्यासक्रमामुळे काही शिक्षित पालकही मुलांचा घरी अभ्यास घेणे टाळतात. अशा पालकांचीही शाळेत विशेष शिकवणी घेतली जाणार आहे. मुलांचा अभ्यास घरच्या घरी घेण्याच्या काही क्लृप्त्या, नियम त्यांना यादरम्यान समजावून सांगितले जाणार आहे.हे अभियान संस्था, शिक्षक आणि पालक यांच्या एकत्रित सहभागातूनच यशस्वी होऊ शकते. पहिल्या टप्प्यातच सगळे विद्यार्थी खाजगी शिकवणीपासून दूर होणार नाहीत. मात्र, शक्य तितक्या जास्त विद्यार्थ्यांना शाळाबाह्यशिकवण्यांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे.