शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

टोल बंद करा, अन्यथा पराभवाला सामोरे जा

By admin | Updated: January 25, 2017 04:52 IST

कोल्हापुरात टोल बंदी होऊ शकते मग ठाण्यात का नाही ? असा सवाल उपस्थित करून मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडे

ठाणे : कोल्हापुरात टोल बंदी होऊ शकते मग ठाण्यात का नाही ? असा सवाल उपस्थित करून मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांकडे आमचा टोल कधी बंद होणार याचा ठाणेकरांनी जाब विचारावा, असे जाहीर आवाहन ठाणे जिल्ह्यात टोलबंदीची चळवळ उभी करणाऱ्या ‘टिसा’ आणि ‘टोल विरोधी समिती’ने ठाणे महापालिका क्षेत्रातील मतदारांना केले आहे.‘टोल बंद करा, अन्यथा पराभवाला सामोरे जा’, अशा शब्दात या समितीने आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. ठाण्यातील नेत्यांत हिम्मत असेल तर त्यांनी तो बंद करून दाखवावाच, असे समितीने म्हटले आहे. कोल्हापूरकर टोल बंद करून दाखवू शकतात मग ठाण्यातील नेत्यांनी काय हातात बांगड्या भरल्या आहेत का, असा सवाल त्यांनी केला. विधानसभेच्या निवडणुकीत टोल बंदीबाबत वचन दिल्यानंतरही ठाणे जिल्ह्यात अद्याप पूर्णपणे टोलबंदी झालेली नाही. मुंबई-ठाणेकरांचा पिच्छा टोल सोडत नसल्याने आगामी निवडणुकीपूर्वी ‘टोल हटवा, मते मिळावा’अशी व्यापक चळवळ गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यातील ‘टिसा’ आणि अन्य ५५ संस्थांच्या माध्यमातून उभी राहिली आहे. दरम्यान, त्याच आशयाचे कार स्टीकर्स, फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून चळवळ तीव्र करण्याचे काम केले गेले आहे.ठाणे शहराच्या प्रवेश व निर्गमननाक्यांवरील टोलनाक्यांमुळे शहरातील जनता, व्यावसायिक, डॉक्टर्स, वकील व सामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण आहे. तसेच राज्यातील इतर ठिकाणचे टोल याआधीच बंद झाले असताना मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलनाक्यांवर वसुली अद्यापही सुरू आहे.ठाणे शहरातील नागरिकांना मुंबईतील एकही पूल न वापरता सुद्धा गेली १८ वर्षे टोलचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. इतर नाक्यांवर शहरातील ५ कि.मी.च्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी असलेल्या सुविधा सुद्धा इतक्या वर्षात मिळाल्या नाहीत, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)