शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक कचऱ्यामुळे तुंबले नाले; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:07 IST

जरीमरी नाल्यातील कचरा व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या नाल्यातील कचरा व गाळ नाल्याशेजारीच काढून ठेवला आहे.

कल्याण : केडीएमसीने बड्या नाल्यांच्या सफाईला सुरुवात केली आहे. अनेक नाले प्लास्टिक पिशव्यांमुळे तुंबले आहेत. नालेसफाईमुळे शहरातील प्लास्टिकबंदीची पोलखोल झाली आहे. काही ठिकाणी नालेसफाई झाल्यानंतर गाळ आणि कचºयाचा ढीग शेजारी रचून ठेवल्याने नागरिकांना नाक मुठीत धरूनच पुढचा मार्ग धरावा लागत आहे.

कल्याण बस डेपोच्या मागच्या बाजूला असलेल्या नाल्यात प्लास्टिक कचºयाचा खच साचला आहे. डेपो परिसरातील सगळा कचरा या नाल्यात टाकला जातो. लक्ष्मी भाजी मार्केटच्या मागच्या बाजूने वाहणाºया नाल्यात बाजारातील सगळा भाजीपाला, पेंढा, फळे, फळांचे लाकडी आणि कागदी बॉक्स असा कचरा टाकला जातो. त्यात प्लास्टिक पिशव्यांचा समावेश आहे. येथे नाल्यात कचºयाचा ढीग असून तो रोज जाळला जातो. त्यामुळे स्टेशनकडे जाणाºया पादचारी व वाहनचालकांना धुराचा त्रास होतो. तसेच या परिसरातील राहणाºया रहिवासी संकुलातील नागरिकांच्या नाकातोंडात धुराचे लोट जात असतात. डोंबिवलीतील मिलापनगरच्या नाल्यातही कचरा साठला आहे. तो अद्याप स्वच्छ करण्यात आलेला नाही. कल्याण पूर्वेतील वालधुनी, विठ्ठलवाडी परिसरातील नाल्यातील कचरा काढण्याचे काम सुरू झाले आहे. हा कचरा नाल्याच्या काठावर काढून ठेवला जात आहे. त्यामुळे गाळ व कचºयाचा ढीग रचला गेला आहे. जरीमरी नाल्यातील कचरा व गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या नाल्यातील कचरा व गाळ नाल्याशेजारीच काढून ठेवला आहे.

हवामान खात्याचा अंदाज चुकला तर...हवामान खात्यानुसार मान्सूनचे आगमन लांबले असले, तरी हा अंदाज चुकला आणि पाऊस पडला तर काढलेला गाळ व कचरा पुन्हा नाल्यात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केलेल्या नालेसफाईचा काही उपयोगहोणार नाही.

प्लास्टिकबंदी कागदावरचराज्य सरकारने २०१८ मध्ये गुढीपाडव्याला प्लास्टिक पिशव्यांविरोधात बंदीचा आदेश काढला. त्यानंतर, केडीएमसीने कारवाई सुरू केली. या कारवाईत सातत्य नसल्याने प्लास्टिक पिशव्यांची छुपी विक्री बाजारात सुरूच आहे. विशेषकरून फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे.