शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

काळ नदीतील दूषित पाणीप्रश्न गंभीर

By admin | Updated: May 31, 2017 06:11 IST

काळ नदीमध्ये शहरातील मोठमोठ्या गृहप्रकल्प इमारतीचे सांडपाणी सोडण्यात आल्याने ही नदी अत्यंत दूषित झाली असून, या नदीच्या पा

लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : काळ नदीमध्ये शहरातील मोठमोठ्या गृहप्रकल्प इमारतीचे सांडपाणी सोडण्यात आल्याने ही नदी अत्यंत दूषित झाली असून, या नदीच्या पाण्याला उग्र वास येत असल्याने ते पाणी आंघोळीला घेण्यासाठी देखील नागरिक कचरत आहेत. या दूषित पाण्याला नियमबाह्य परवानगी देणारी माणगाव नगरपंचायत हीच कारणीभूत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत कृती समितीने अधिक आक्र मक भूमिका घेताना या प्रश्नाबाबत रायगड जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती ज्ञानदेव पवार यांनी मुंबई येथे काँग्रेस भवनात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. हा लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न असून याबाबत आपण प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्र ार दाखल करा, त्यांच्याकडे मी देखील बोलून घेतो, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ज्ञानदेव पवार यांना सांगितले.या दूषित पाणीप्रश्नाबाबत आमदार सुनील तटकरे यांनी कृती समिती माणगाव व नगरपंचायतीच्या समवेत नगरपंचायत कार्यालयात १५ दिवसांपूर्वी बैठक घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. माणगाव नगरपंचायतीकडून काही बिल्डरांवर थातूरमातूर कारवाई करून कृती समितीची समज काढण्याचा प्रयत्न केला गेला. कारवाई करताना इमारतींच्या जलवाहिन्या तोडून टाकण्यात आल्याचे व कारवाई केल्याचे कृती समितीला भासविण्यात आले. तोडलेल्या या जलवाहिन्या लगेचच दुसऱ्या दिवशी जोडण्यात आल्याने माणगावकर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. काही इमारतींच्या गटारांमध्ये नागरिकांचे समाधान करण्यासाठी थोडीशी माती टाकण्यात आली आहे. परंतु सद्यस्थिती पाहता अजूनही काळनदीत जाणारे गटारांचे सांडपाणी नगरपंचायतीने बंद केलेले दिसत नाही. कृती समितीला व माणगावमधील पत्रकारांना वेळ मारून नेण्यासाठी लेखी पत्राद्वारे काम करण्याचे आश्वासन देऊन आजपर्यंत केवळ दिशाभूलच केली आहे. या गंभीर प्रश्नाबाबत कृती समिती माणगाव यांची २ जून रोजी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली असून हा प्रश्न आता गंभीर रूप धारण करू लागला आहे. नुकतीच पाच दिवसांपूर्वी माणगाव तालुक्यातील टेमपाले येथे दूषित पाण्यामुळे कावीळचे २३ रु ग्ण आढळून आले. आता त्याठिकाणी साथ आटोक्यात आहे. या भीषण प्रश्नाबाबत कृती समितीने आपला लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्कृती समिती माणगावचे कार्यकर्ते ज्ञानदेव पवार, बाळशेठ घोणे, सुरेंद्र साळी, सुरेश मोहिते, सलीम शेख, मजीद हाजिते आदींनी व्यक्त के ला.