शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Jayant Savarkar: समता विचार प्रसारक संस्थेची जयंत सावरकरांना आदरांजली!  

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: July 24, 2023 15:19 IST

Jayant Savarkar: एक हरहुन्नरी व रंगमंच - चित्रपटांत रसरसून काम करणारा कलाकार म्हणून जयंत सावरकर कायम स्मरणात राहतील. माजिवडा येथे अत्यंत साधं व समाधानी आयुष्य व्यतित करणारे जयंत सावरकर २०१९ साली वंचितांचा रंगमंचावर ६ वा युवा नाट्य जल्लोषला प्रमुख पाहुणे या नात्याने ते आले होते

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : एक हरहुन्नरी व रंगमंच - चित्रपटांत रसरसून काम करणारा कलाकार म्हणून जयंत सावरकर कायम स्मरणात राहतील. माजिवडा येथे अत्यंत साधं व समाधानी आयुष्य व्यतित करणारे जयंत सावरकर २०१९ साली वंचितांचा रंगमंचावर ६ वा युवा नाट्य जल्लोषला प्रमुख पाहुणे या नात्याने ते आले होते. ते अत्यंत मनमिळावू व निगर्वी स्वभावाचे होते याची प्रचिती त्यावेळी आली होती, अशा शब्दात समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम व सचिव अजय भोसले यांनी जयंत सावरकरांप्रतीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. जयंत सावरकरांनी नाट्यजल्लोषला भरभरून पाठींबा दिल्याच्या आठवणी त्यांना विनम्र आदरांजली वहातांना संस्थेने जागवल्या आहेत.

सावरकरांनी त्यावेळी नाट्यजल्लोष मध्ये युवकांनी सादर केलेल्या मेट्रो व वृक्ष कत्तल, एचआयव्ही एड्स ग्रस्तांचं जीणं, महिला सक्षमीकरणासाठी निर्भयता आदी ज्वलंत विषयांवरील नाटिका पाहून कलाकारलकार्यकर्त्यांचे व त्यांना प्रेत्साहन देणाऱ्या समता संस्थेचे अपार कौतुक केले होते. वंचित समुहांना आपल्या भावना, समज व समस्या आपल्या भाषेत व शैलीत मांडण्याची संधी देणारा नाट्य जल्लोष हे आपल्या समाजाचे व नाट्य विश्वाचे वैभव आहे, अशा शब्दात त्यांनी वंचितांचा रंगमंचाचा गौरव केला होता. संस्थेच्या मते सावरकरांच्या निधनाने, आपण कलाविश्वाचे वैभव गमावले आहे. कलाविश्वाला व विशेषतः वंचितांचा रंगमंचाला जयंत सावरकरांची उणीव नक्कीच जाणवत राहील!

टॅग्स :thaneठाणेMarathi Actorमराठी अभिनेता