शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना ‘रताळ्यां’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:05 IST

शेतीसोबत जोडधंदा : कोळशाचापाडा ‘रताळ्यांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध

हुसेन मेमन।लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : जव्हार तालुक्यातील कोळश्याचापाडा हे डोंगराळ भागातील गाव ‘रताळ्याचे गाव’ म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. येथील ५० ते ६० आदिवासी शेतकरी रताळ्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेऊन त्याच्या विक्रीतून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत आहेत. या उत्पादनाच्या लागवडीसाठी आवश्यक वेलींच्या विक्रीतून तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागत आहे. त्याचा फायदा या पिकाच्या क्षेत्र वाढीसाठी होत असून आदिवासींच्या सक्षमीकरणामध्ये रताळे उत्पादन महत्त्वाची भूमिका बजावत आहे.रताळे हे कंदमूळ असून आरोग्याच्या दृष्टीने उपायकारक रानमेवा आहे. त्यामुळे लोक हौशीने या गुणकारी रताळ्यांना विकत घेऊन खातात. रताळे कोणी उकळून खातो, तर कोणी भाजून खातो. खाण्यासाठी गोड असल्यामुळे नागरिकांचा हा आवडता रानमेवा आहे. कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारा हा शेतीसोबत असलेला जोडधंदा असून या काळात येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात रताळेलागवड करीत आहेत.रताळी लागवडीसाठी उतार आणि उत्तम निचºयाची जमीन या पिकासाठी आवश्यक असते. टेकडीच्या उतारावरील वरकस जमिनीत हे पीक घेता येते. ६० सें.मी. अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करून त्याची लागवडकेली जाते.कोकण अश्विनी, वर्षा किंवा श्रीवर्धनी या जातींचा वापर केला जातो. तसेच कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्राने रताळी पिकांवरील सोंड्या भुंग्याच्या नियंत्रणाबाबत प्रात्यक्षिके आयोजित केली. त्यामुळे किडीस आळा बसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.एका एकरात रताळीलागवड केली आहे. त्याकरिता प्रतिजुडी २० रुपयांप्रमाणे दोन हजार रुपयांचे बेणे लागले. या हंगामात पाण्याची आवश्यकता नाही. तीन महिन्यांत उत्पादन मिळेल. त्याचा आहारात समावेश करून कुटुंबाला पोषण मूल्य तर विक्रीतून रोख रक्कम मिळेल. -पांचू चिभडे, शेतकरी, न्हयाळे, सुतारपाडा, जव्हार