शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गौरीसाठी ऑक्साइड दागिन्यांचा ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:48 IST

पारंपरिक दागिन्यांचा साज, खरेदीचा उत्साह लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गणपतीपाठोपाठ रविवारी घरोघरी गौरींचे आगमन होणार असून, गौराईला सजवण्याकरिता ...

पारंपरिक दागिन्यांचा साज, खरेदीचा उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गणपतीपाठोपाठ रविवारी घरोघरी गौरींचे आगमन होणार असून, गौराईला सजवण्याकरिता यंदा ऑक्साइड दागिन्यांचा ट्रेण्ड बाजारात पहायला मिळत आहे. अत्यंत आकर्षक, सुबक अशा या दागिन्यांच्या खरेदीकरिता महिलावर्गाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

शुक्रवारी आपल्या लाडक्या गणेशाचे आगमन झाल्यानंतर रविवारी गौरींचे आगमन होत आहे. हातात एकच दिवस खरेदीसाठी असल्याने अनेकांनी यापूर्वीच गौरीची खरेदी केली आहे. बाजारपेठ गौरी- गणपतीच्या सजावटीच्या वस्तूंनी सजली आहे. आकर्षक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे. विविध आकारातील गणपती व गौरीच्या मूर्ती, गौरीचे मुखवटे यांच्यासह दागिने, रेडिमेड साड्यांच्या खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू आहे.

गौरीचे पितळी, शाडू माती आणि पीओपीचे मुखवटे बाजारात उपलब्ध आहेत. सुबक आकारातील आखीव-रेखीव मुखवटे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. गौरीसाठी लागणारा दागिन्यांचा साज लक्ष वेधून घेणारा आहे. सोनेरी रंगातील दागिने आणि ऑक्साइड दागिने यंदा आकर्षण ठरले आहेत. ऑक्साइड दागिन्यांना महिलावर्गाची पसंती आहे. गौरीच्या सजावटीच्या वस्तूंच्या दरात १० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती विक्रेते स्वप्निल तंटक यांनी दिली. दागिन्यांमध्ये मोहनमाळ, ठुशी, बोरमाळ, लक्ष्मीहार, चपला हार, मोत्याचे सर, कोल्हापुरी साज, चंद्राचे मंगळसूत्र, कमरपट्टा, मुकुट, बाजूबंद, झुमके, जुडापीन, कानातील झुबे, वेल, पूर्ण कानवेल आदी पारंपरिक पद्धतीचे वैविध्यपूर्ण अलंकार पहायला मिळतात. मंगळसूत्रातही विविध प्रकार उपलब्ध आहेत. हे दागिने साधारण २०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. पाचवारी आणि नऊवारी या दोन्ही प्रकारात रेडिमेड साड्या उपलब्ध आहेत. इमिटेशन ज्वेलरीकडे महिलावर्गाचा कल असल्याचे तंटक म्हणाले.

---

गणपतीसाठीही सजावटीचे दागिने

यंदा गणरायासाठी सोन्याचे केळीचे झाड आले आहे. या झाडाला चांगलीच मागणी असल्याचे सोन्या-चांदीचे व्यापारी कमलेश जैन म्हणाले. त्याचबरोबर गजंतलक्ष्मी, मूषक, मोदक, आंब्याचे पान, अष्टविनायक पान, मोत्यांच्या मण्यांच्या बाली, मुकुट, शाल, नेकलेस, शेला, कमळाचे फूल, जास्वंद फूल, मोदकाचे नेकलेस, दुर्वा हेदेखील विक्रीसाठी आहेत. सोने, चांदी आणि इमिटेशन ज्वेलरी बाजारात उपलब्ध आहे.

फोटो मेलवर

............

वाचली