शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींची तहान भागवण्यासाठी तलाव खणला

By admin | Updated: June 4, 2016 01:32 IST

आदिवासी भागातील तलावात गेल्या काही वर्षांपासून आसपासची माती वाहून गेल्याने तलाव बुजला होता. त्या तलावाची खोदाई करून परिसरातील आदिवासींना पाणीसाठा उपलब्ध करण्याच्या हेतूने

भिवंडी : आदिवासी भागातील तलावात गेल्या काही वर्षांपासून आसपासची माती वाहून गेल्याने तलाव बुजला होता. त्या तलावाची खोदाई करून परिसरातील आदिवासींना पाणीसाठा उपलब्ध करण्याच्या हेतूने रोटरी क्लब आॅफ ठाणे ग्रीनच्या अध्यक्षा व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी तलावाची खोदाई करून या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात केली. दरम्यान, टंचाई दूर होण्याबरोबरच तलावातील पाण्यामुळे शेती आणि भाजीपाल्याचा रोजगारही मिळणार आहे.तालुक्यातील पायगाव ग्रामपंचायत हद्दीत भोयाचापाडा व ठाकूरपाडा हे ८००लोकवस्तीचे पाडे आहेत. या परिसरातील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. या आदिवासी भागात मुलांच्या शिक्षणासाठी शाळेला मदत करण्याच्या हेतूने रोटरी क्लब आॅफ ठाणे ग्रीनच्या अध्यक्षा डॉ. चित्रादेवी चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी भोयाचापाडा व ठाकूरपाडा येथे भेट दिली. या पाड्यातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीकरिता व जनावरांसाठी दीड एकर जागेत तलाव बांधलेला होता. मात्र, शेजारील डोंगरमाथ्यावरून वाहत आलेल्या मातीने तलाव पूर्णपणे बुजून गेला होता. ही माहिती उपस्थित रोटरीच्या पदाधिकाऱ्यांना समजल्याने त्यांनी पिण्याच्या पाण्यास प्राधान्य देत तलाव खोदाईचा संकल्प केला. या तलाव खोदाईमुळे परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.गुरुवारी सकाळी रोटरी क्लबचे डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट डॉ.चंद्रशेखर कोलवेकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. पाड्यात बुजलेल्या तलावाची खोदाई रोटरी क्लब स्वखर्चातून करणार आहे. तसेच तळ्यातील पाण्यातून शेती व भाजीपाल्याचा रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर या संस्थेद्वारे आदिवासी पाड्यातील शाळा डिजिटल करून या बांधवांना व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही लवकर हाती घेणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनीधी)