शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने उडाली त्रेधातिरपीट!

By admin | Updated: June 28, 2017 03:13 IST

कल्याण-डोंबिवली परिसरात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची मंगळवारीही संततधार कायम होती. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले.

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची मंगळवारीही संततधार कायम होती. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले. अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. कल्याणच्या शिवाजी चौकात रस्ता खचून भगदाड पडल्याने तेथे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.कल्याण-डोंबिवली परिसरात आतापर्यंत ४२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. डोंबिवलीत रेल्वेस्थानक परिसर, मार्केट, पश्चिमेतील कोपर रोड, जुनी डोंबिवली, फुले रोड, तसेच पूर्वेतील रामनगर, गोग्रासवाडी, तुकाराम नगर, मानपाडा रोड, औद्योगिक निवासी विभाग, नांदिवली-भोपर, कल्याण-शीळ रोड, पश्चिमेतील गोपीनाथ चौक, केळकर रोड आदी ठिकाणी मंगळवारी माठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कल्याणमध्ये शिवाजी चौक, महमद अली चौक, जोशी बाग, कुं भारवाडा आदी परिसर जलमय झाले होते. महमद अली चौक परिसरातील दुकानांमध्ये गटाराचे सांडपाणी शिरले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाजी चौकात रस्ता खचल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. मात्र, त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. या चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाणी आणि खचलेल्या रस्ता यामुळे तासभर वाहतूककोंडी झाली होती. बल्याणी येथील घरे पाण्याखालीलोकमत न्यूज नेटवर्क टिटवाळा : पावसाच्या संततधारेमुळे केडीएमसीतील प्रभाग क्र मांक ११ बल्याणी येथील मोहिली रस्त्यावरील चाळींमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे चाळीतील रहिवाशांचे हाल झाले आहेत. याप्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन कानाडोळा करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.पावसाने तीन-चार दिवसांपासून हजेरी लावल्याने मोहिली रस्त्यावरील चाळींमध्ये तीन ते चार फूट पाणी शिरले आहे. त्यामुळे तेथील अनेक कुटुंबे पाण्याखाली आहेत. घरात पाण्याबरोबर गाळ आल्याने त्यांचे अतोनात हाल झाले आहेत. केडीएमसीतील एका सफाई कामगाराने केलेल्या चाळीच्या बांधकामामुळे नाला बुजल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचलेली नाही. बल्याणी परिसरात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वस्ती आहे. सोमवारी ईदच्या दिवशी तेथील रहिवाशांना पूरसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागला. तीन दिवसांपासून येथील पुरुष नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडले नाहीत.