शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आगीपासूनच्या संरक्षणासाठी शहर विकास विभागाची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:34 IST

भाजपच्या तक्रारीनंतर आली जाग; रात्रपाळीतही सुरक्षारक्षक तैनात

ठाणे : ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागावर अनेक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे आगीचे सावट असल्याची भीती भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी व्यक्त केल्यानंतर आता प्रशासनाने या विभागात आगप्रतिबंधक उपाययोजना आहेत की नाही, याबाबत तपासणी करून झाडाझडती सुरू केली.पवार यांनी बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र दिल्यानंतर प्रशासनाने शुक्रवारपासून शहर विकास विभागाची सुरक्षा वाढवून विभागातील इलेक्ट्रिकल वायरिंगची तपासणी सुरू केली आहे. तसेच अग्निशमन विभागानेही पाहणी केली आहे.शहर विकास विभागात गेल्या काही वर्षांपासून हजारो इमारतींचे सीसी, पार्ट ओसी, ओसीसह टीडीआर दिल्याची अनेक कागदपत्रे आहेत. त्यातील काही वादग्रस्त प्रस्तावांच्या अनेक तक्रारीही सरकारदरबारी दाखल आहेत. तर, काहींची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे चौकशीही सुरू आहे. काही व्यवहारांसंदर्भात उच्च न्यायालयाकडे जनहित याचिकाही (पीआयएल) दाखल असून या सर्व ‘स्फोटक’फायलींच्या साठ्यास स्वत:च्या बचावासाठी संबंधितांकडून आग लावण्याची भीती वाटत असल्याची तक्रार त्यांची होती. त्यानंतर प्रशासनाने झाडाझडती घेण्यास सुरूवात केली आहे.सर्व विभागांची तपासणी करामनसेचे विभागअध्यक्ष महेश कदम यांनी केवळ शहर विकास नव्हे तर महापालिकेच्या सर्व विभागांचे फायर आॅडिट करण्याची मागणी आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.अशी घेण्यात येत आहे दक्षतापवार यांच्या तक्रारीनंतर उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी सुरक्षा विभाग, अग्निशमन विभाग आणि विद्युत विभागाला तातडीचे पत्र पाठवून या विभागाची योग्य ती दक्षता घ्यावी, अशी सूचना केली आहे.त्यानुसार, दिवसभर तर या विभागात सुरक्षारक्षकांची गस्त असतेच, आता मात्र रात्रपाळीही सुरूकरून त्यासाठी दोन सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. तसेच अग्निशमन उपकरणे कार्यरत आहेत किंवा कसे, याच्या तपासणीचे कामही सुरू झाले आहे.विद्युत विभागाकडूनही या विभागातील वायरिंग सुस्थित आहे की नाही, की कुठे शॉर्टसर्किटची भीती आहे, याची तपासणी सुरू असल्याची माहिती बुरपुल्ले यांनी दिली.