शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

सुशोभीकरणाच्या नावाखाली मीरा भाईंदर महापालिकेचा झाडेतोड कार्यक्रम सुरूच

By धीरज परब | Updated: January 15, 2024 19:44 IST

घोडबंदरच्या नैसर्गिक तलाव किनाऱ्याची जुनी झाडे सुशोभीकरणाच्या नावाखाली तोडण्याचा निर्णय 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचा झाडे तोडण्याचा एककलमी कार्यक्रम मात्र सुरूच आहे . आता घोडबंदर येथील नैसर्गिक तलाव सभोवताली असलेल्या १६ मोठ्या व जुन्या झाडांची कत्तल सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिकेने चालवली आहे . त्या बाबत हरकती येऊन देखील सुनावणी मात्र पालिकेने घेतली नाही . 

घोडबंदर गावा कडे जाणाऱ्या तसेच बस डेपो पासून काही अंतरावर जुना नैसर्गिक तलाव आहे . सदर तलाव नैसर्गिक असल्याने संरक्षित आहेतच शिवाय पाणथळ क्षेत्र आहे . ह्या तलावाच्या सभोवताली जुनी अनेक झाडे आहेत . सातबारा नोंदी हा तलाव म्हणून नमूद असून महापालिकेची मालमत्ता नाही . मध्यंतरी रस्ता रुंदीकरण आणि गटार बांधण्याच्या नावाखाली दर्शनी भागातील अनेक मोठी जुनी झाडे महापालिकेने कत्तल केली होती . 

आता तलाव सुशोभीकरणच्या नावाखाली महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील उरल्या सुरल्या जुन्या व मोठ्या झाडांची कत्तल करण्याचा घाट घातला आहे . बांधकाम विभागाच्या प्रस्तावा नुसार वृक्ष प्राधिकरण विभागाने येथील सुमारे ५० ते ५५ फूट उंच २ वडाची जुनी मोठी झाडे , ३ उंबर , २ काटेरी चिंच , करंज आदी १६ झाडांची कत्तल करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती . त्याला फॉर फ्युचर इंडिया ह्या संस्थेने विरोध करत हरकत नोंदवली . परंतु हरकत नोंदवून देखील त्यावर पालिकेने सुनावणीच घेतली नाही . उलट संस्थेचे अध्यक्ष हर्षद ढगे यांना पत्र देऊन  तक्रार निकाली काढल्याचे कळवले . 

महापालिकेच्या बांधकाम विभाग आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या संगनमताने आता पर्यंत शहरातील काही हजार झाडांची कत्तल केली गेली असून जुन्या आणि मोठ्या झाडांचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास केला गेला आहे . नैसर्गिक तलाव असताना मोठी झाडे तशीच ठेऊन सुशोभीकरण करण्या ऐवजी ठेके काढून ठेकेदारासह संबंधितांचा आर्थिक फायदा करून देण्यासाठी झाडांवर संक्रांत आणली जात असल्याचा आरोप हर्षद ढगे यांनी केला आहे . या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर व फौजदारी कारवाईची मागणी त्यांनी केली आहे .