शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बिल न दिल्यास ‘खरेदी केलेल्या वस्तू मोफत’ या रेल्वेच्या उपक्रमाकडे प्रवाशांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:22 IST

बिल घेण्याचे प्रमाण अवघे १० टक्के : गाड्यांच्या वेळापत्रकामुळे प्रवाशांत निरुत्साह

ठाणे : रेल्वेस्थानकांवरील उपाहारगृहांतील अन्नपदार्थ खरेदी करताना बिल न दिल्यास खरेदी केलेले पदार्थ मोफत दिले जातील, असे रेल्वे प्रशासनामार्फत वारंवार सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात बिल घेण्यास वेळ नसल्याने रेल्वेच्या या उपक्रमाकडे प्रवाशांनी चक्क पाठ फिरवल्याचे दिसत आहे. ठाणे रेल्वेस्थानकात बिल घेण्याचे प्रमाण जवळपास १० टक्क्यांच्या पुढे जात नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

ठाणे रेल्वेस्थानकातून मध्य आणि हार्बर (वाशी-पनवेल) तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. दररोज ठाण्यातून मध्य रेल्वेच्या ७९० अप-डाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेल या मार्गावर २४६ अप-डाउन तसेच १३२ अप-डाउन अशा एक्स्प्रेस धावतात. तसेच ठाण्यातून नियमित ३.५० लाख लोकल प्रवासी तिकिटांची विक्री होत आहे. या प्रवासीसंख्येसह पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास क रणारे असे दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी येजा करतात.

ठाणे स्थानकात एक ते १० ए असे ११ फलाट असून त्यांच्यावर एकूण १८ उपाहारगृहे आणि एक फूड प्लाझा आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या उपाहारगृहधारकांकडून बिल न दिल्यास अन्नपदार्थ मोफत मिळतील, असे रेल्वे प्रवासात वारंवार कानांवर पडते. यानुसार, उपाहारगृहधारकांनीही मशीन लावून बिल देण्याची तयारी दर्शवली आहे. पेपरच्या रोलसाठी १५ रुपये जास्त मोजण्याचीही तयारी केली आहे. मात्र प्रवाशांना बिलासाठी वेळ नसल्याचे सांगितले जाते.रविवारी तर शून्य प्रतिसाद : रेल्वेस्थानकावरील सर्वच उपाहारगृहांतून दिवसाला किती बिल देण्यात आलेले आहेत, याची माहिती दररोज ठाणे रेल्वे प्रशासनाकडून घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर ती माहिती पुढे मुंबईतील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवली जाते. त्यातच बिल घेण्याचे प्रमाण हे साधारणत: १० टक्क्यांच्या आसपास पोहोचलेले आहे. मात्र, रविवारी हे प्रमाण जवळपास मायनसमध्येच दिसत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जाते.

रेल्वेचा हा उपक्रम चांगला आहे. पण, गाडी गेल्यावर दुसरी गाडी कधी येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे १० रुपयांचा एखादा अन्नपदार्थ घेतल्यानंतर त्याचे बिल घेणे शक्य नाही. ते अन्नपदार्थ घेऊन बिल न घेताच जाणेच योग्य ठरते. - सुशांत चव्हाण, प्रवासी