शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारपासून महालक्ष्मीमातेची यात्रा

By admin | Updated: April 20, 2016 01:52 IST

महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यात प्रसिद्ध असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी मातेच्या यात्रा उत्सावाला २२ एप्रिल पासून सुरूवात होणार असून ती ६ मे पर्यंत राहणार आहे

शौकत शेख,  डहाणूमहाराष्ट्र तसेच गुजरात राज्यात प्रसिद्ध असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महालक्ष्मी मातेच्या यात्रा उत्सावाला २२ एप्रिल पासून सुरूवात होणार असून ती ६ मे पर्यंत राहणार आहे. या यात्रेत लाखो भक्तांना सोयीसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महालक्ष्मी देवस्थान तसेच पोलीस व महसूल यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.तब्बल पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, राजस्थान, वापी, बलसाड, सुरत, अहमदाबाद, तसेच पालघर, ठाणे जिल्ह्यातील लाखो भाविक येथे दर्शनाला येत असतात. यात्रा सुरू झाल्यानंतर दररोज येथे एक ते दिड लाख भाविक आपल्या कुटूंबासह हजेरी लावत असल्याने प्रशासनाने आणि महालक्ष्मी ट्रस्टचे नियोजन कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक असते. त्यामुळे दरवर्षी सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलीस तसेच देवस्थान ट्रस्ट एक महिन्यापूर्वीच बैठक घेऊन शासनाच्या प्रत्येक विभागाला जबाबदारी सोपवून यात्रा सुरळीत कशी पार पाडता येईल याच्यावर विचार विनिमय करून उपाय योजना केल्या आहेत.पालघर व ठाणे जिल्ह्यातील आदिवासींची आदिमाता, जागृक आणि नवसाला पावणारी देवी अशी ओळख असलेली डहाणूची महालक्ष्मी ही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच हे ऐतिहासिक देवस्थान असल्याने मुंबई तसेच गुजरातकडे जाणारे नागरीक महालक्ष्मी मातेच्या दर्शना शिवाय पुढे जात नाही. गझनीच्या स्वारीनंतर हे मंदिर तोडण्यात आले. पुढे मांगल साम्राज्याच्या अस्तानंतर पुन्हा मंदिराची उभारणी करण्यात आली. या मंदिराबाबत पुराणातच अनेक आख्यायीका आहेत. कोल्हापुरची महालक्ष्मी गुजरातकडे जात असताना तिला घनदाट जंगल असलेला हा परिसर खूपच आवडला. म्हणून देवीने गडाच्या टोकावर मुक्काम केला. पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता असेही सांगितले जाते. विशेष म्हणजे महामक्ष्मी मातेचे मुख्य मंदिर डहाणू स्टेशनपासून अठरा किलोमिटर आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाक येथून चार कि. मी. असलेल्या वधना गावाजवळील गडावर आहे. मंदिर पायथ्यापासून चारशे फुट उंचावर असून तेथे जाण्यासाठी नऊशे पायऱ्या आहेत. तर गडाच्या पायथ्याशी देवीचे भव्य आणि आकर्षक असे मंदिर आहे.