शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कचराकोंडी अंशत: सुटली!

By admin | Updated: May 31, 2016 03:09 IST

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत बायोगॅस प्लांट उभारणीच्या कामाला ग्रामस्थांचा विरोध मावळल्याने उंबर्र्डे परिसरात या कामाला प्रारंभ झाला आहे

कल्याण : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत बायोगॅस प्लांट उभारणीच्या कामाला ग्रामस्थांचा विरोध मावळल्याने उंबर्र्डे परिसरात या कामाला प्रारंभ झाला आहे. त्याचबरोबर बारावे, उंबर्डे आणि मांडा या ठिकाणच्या प्रस्तावित शास्त्रोक्त भरावभूमी प्रकल्पाला पर्यावरण विभागाची प्राथमिक मंजुरी मिळाल्याने घनकचरा व्यवस्थापनाला गती येण्याची चिन्हे आहेत. घनकचरा व्यवस्थापन नीट न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिकेची कानउघाडणी केली होती आणि नव्या बांधकामांवर बंदी घालून दणका दिला होता. त्यामुळे केडीएमसी खडबडून जागी झाली. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करणे त्याचबरोबर बारावे, उंबर्डे आणि मांडा याठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने भरावभूमी प्रकल्प राबवणे आणि १३ ठिकाणी बायोगॅस प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, भरावभूमी प्रकल्प राबवण्यास उंबर्डेवासीयांनी नकार दिला आणि बायोगॅस प्लांटलादेखील विरोध दर्शवला होता. १३ ठिकाणी हे प्लांट उभारले जाणार असल्यामुळे एकाच वेळी सर्वत्र प्लांट सुरू झाले पाहिजेत. केवळ उंबर्डेला बायोगॅस प्लांट उभारू नका. कारण, भविष्यात जर प्लांट बंद पडला आणि कचरा आणून गावात टाकला गेला, तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही सर्वपक्षीय उंबर्डे डम्पिंगविरोधी कृती समितीने उपस्थित केला होता. समितीच्या शिष्टमंडळाने अलीकडेच आयुक्त ई. रवींद्रन, महापौर राजेंद्र देवळेकर यांची भेट घेऊन विरोध दर्शवला होता. यावेळी झालेल्या चर्चेत बायोगॅस प्लांट बंद होणार नाही, असे आश्वासन शिष्टमंडळाला आयुक्तांकडून देण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात स्थानिकांचा विरोध मावळल्याने उंबर्डे येथे बायोगॅस प्लांटच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०१६ पर्यंत मार्गी लागेल, असा दावा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.