शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन सेवा ४० दिवसांनी पूर्वपदावर, प्रवाशांना दिलासा, २१ बस धावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 12:40 IST

शुक्रवारी रात्री ५ बस तर आज शनिवारी सुरुवातीला १५ व दुपारनंतर सहा बस सुरू केल्या. कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारप्रश्नी पोलीस आयुक्तांनीच पुढाकार घेतल्याने त्यावर तोडगा काढून कर्मचारीही कामावर रुजू झाले. 

मीरा राेड :मीरा-भाईंदर महापालिक परिवहन सेवेच्या ठेकेदाराचा ठेका रद्द केल्यावर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने पोलीस बंदोबस्त देण्यास सांगितले. त्या अनुषंगाने पालिका आयुक्तांनी शुक्रवारी पोलीस अधिकारी, ठेकेदार व परिवहन कर्मचारी संघटना यांची बैठक घेत बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री ५ बस तर आज शनिवारी सुरुवातीला १५ व दुपारनंतर सहा बस सुरू केल्या. कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारप्रश्नी पोलीस आयुक्तांनीच पुढाकार घेतल्याने त्यावर तोडगा काढून कर्मचारीही कामावर रुजू झाले. 

आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, प्रशासनाने मुद्दाम बससेवा स्वत:च सुरू केली नाही. पालिकेच्या विधी सल्लागार आणि ठेकेदार आदींचे संगनमत असल्याने न्यायालयात पालिका हिताची बाजू भक्कमपणे मांडली जाणार नाही, अशी कल्पना होती. न्यायालयाच्या आदेशावरून ते स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मीरा-भाईंदर  - वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी पुढाकार घेत त्यावर तोडगा काढला. दाते यांच्या सूचनेनुसार बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत २० हजार रु पये व बोनस देण्याची चर्चा झाली. ठेकेदाराने मंगळवारी प्रत्येकी पाच हजार बोनस द्यायचा आणि उरलेली रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले.

शुक्रवारी रात्री भाईंदर ते उत्तन, चौक आणि मीरा रोड भागात पाच बस चालवण्यात आल्या. शनिवारी उपायुक्त अजित मुठे यांनी ठेकेदारास २१ बस नागरिकांच्या सेवेत सुरू करण्याचे पत्र दिले होते. परंतु, सकाळी १५ बस ठेकेदाराने सुरू केल्या असल्याची माहिती मुठे यांनी दिली.

या मार्गावर साेडण्यात आल्या बस - भाईंदर पश्चिमहून उत्तन, चौक , ठाणे, उत्तन ते मानोरी, भाईंदर पूर्वेहून बोरिवली तर मीरा रोडवरून रामदेव पार्क, शांती विद्यानगरी - घोडबंदर डेपो, वेस्टर्न पार्क , ठाणे या मार्गावर बस सोडण्यात आल्या. १०० कर्मचारी कामावर हजर झाले होते. दुपारनंतरआणखी सहा बस सुरू करण्यात आल्या.  यामुळे शहरापासून लांब राहणाऱ्या प्रवाशांना माेठा दिलासा मिळाला आहे. बस बंद असल्यामुळे रिक्षाचा खर्चकरावा लागत हाेता.

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर