शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’च्या मशिनरींची अखेर होणार वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:21 IST

ग्रामीण रस्त्याची होणार चाळण : सदस्यांचा विरोध मावळला

ठाणे : मुंबई ते नागपूर हा ‘महाराष्ट्र समृद्धी कॉरिडोर’ (एमएससी) या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मोठमोठ्या मशिनरी लागणार आहे. या मशिनरी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांवरून धावणार आहे. यामुळे रस्ते खराब होऊन ग्रामीण जनतेच्या समस्या वाढणार आहेत. यामुळे जिल्हा परिषद काही सदस्यांनी यास विरोध केला होता. अखेर, नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विरोध मावळल्यामुळे या रस्त्यांवरून मशिनरी वाहतुकीस मंजुरी मिळाली आहे.

या महामार्गाचे काम एका खाजगी कंपनीकडून होत आहे. यासाठी कंपनी मोठमोठ्या मशिनरी व वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करणार आहे. या वाहनांमुळे ग्रामीण रस्त्यांची चाळण होऊन ते खराब होतील. याचा फटका ग्रामीण जनतेला बसणार असून विविध समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे संबंधित गावकऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या सदस्यांनीदेखील या रस्ते वापरण्याच्या परवानगीला विरोध दर्शवला होता. मात्र, तो आता मावळला असून संबंधित सदस्यांनी सहमतीने संमती दिल्यामुळे रस्ते वापरण्यास जिल्हा परिषदेने परवानगी मंजूर केली आहे.डिपॉझिट न घेतल्याने नाराजीया वाहनांमुळे खराब होणाºया रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा निधी संबंधित कंपनीकडून आधीच डिपॉझिट करून घेण्याच्या मुद्यावरही बºयाच वेळा चर्चा झाली. पण, ठोस आश्वासनापूर्वीच रस्ते वापरण्याच्या परवानगीला मंजुरी दिल्याचे काही नाराज सदस्यांकडून सांगितले जात आहे. या महामार्गाची रुंदी १२० मीटर एवढी प्रशस्त आहे. ५२ हजार एकर जमिनीचा वापर होत आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यातील ४४ गावांमधील ९८० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा समावेश आहे. हा समृद्धी महामार्ग ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, कल्याण या दोन तालुक्यांतून प्रत्येकी १० किमी गेला आहे. तर, शहापूर तालुक्यातून सर्वाधिक ६० ते ६५ किमी जात आहे. हा महामार्ग तयार करण्यासाठी आता जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी शहापूर तालुक्यातील दांडा-फुगाळे ते वाशाळा, ढाकणे कोथळे, या रस्त्यांवरून वाहने सतत रात्रंदिवस येजा करणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग