शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतीमधील कुटुंबांचे वर्तकनगरातच स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 04:29 IST

वर्तकनगर पोलीस वसाहतीमधील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे स्थलांतर आता याच भागातील आकृती प्रकल्पामध्ये केले जाणार आहे.

ठाणे - वर्तकनगर पोलीस वसाहतीमधील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचे स्थलांतर आता याच भागातील आकृती प्रकल्पामध्ये केले जाणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी या कुटुंबांची भेट घेऊन अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा तिढा सोडवला.वर्तकनगर पोलीस वसाहतीमधील सात इमारती अतिशय धोकादायक असल्याने येथील ३३० कुटुंबांचे स्थलांतर करण्याचे आदेश ठाणे महापालिकेने दिले होते. भार्इंदरपाडा येथील लोढा स्प्लेंडोरा गृहसंकुलात या कुटुंबांना हलवण्यात येणार होते. पावसाळ्यास सुरुवात झाल्याने ही प्रक्रिया त्वरेने करण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या वर्तकनगर प्रभाग समितीच्या पथकाने शनिवारी इमारतींची पाहणी करून कारवाईस सुरुवातही केली होती. मात्र, भार्इंदरपाडा येथे जाण्यास पोलीस वसाहतीमधील कुटुंबांनी तीव्र विरोध केला. मुलांची शाळा आणि कुटुंबातील नोकरदारवर्गासाठी भार्इंदरपाडा हे सोयीचे नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे होते. एमएमआरडीएच्या आयुक्तांशी पालकमंत्र्यांनी लगेच संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावला. आकृती प्रकल्पामध्ये जवळपास १५० कुटुंबांचे स्थलांतर होऊ शकेल. उर्वरित कुटुंबांचीही सोयीच्या ठिकाणी व्यवस्था करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेवर रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. यावेळी खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, स्थानिक नगरसेविका, महापालिका अधिकारी राजीव खांडपेकर आणि इतर उपस्थित होते.भार्इंदरपाडा लांब असून तेथील घरे केवळ १६० चौरस फूट आकाराची असल्याने वर्तकनगरातील आकृती किंवा खेवरा सर्कल या पालिकेच्या रेंटल हाउसिंगमध्ये स्थलांतर करण्याची मागणी रहिवाशांनी केली होती.त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दुपारी पोलीस वसाहतीमधील कुटुंबांची भेट घेतली. स्थानिक रहिवाशांच्या समस्या पालकमंत्र्यांनी यावेळी जाणून घेतल्या.रहिवाशांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आढळल्याने वर्तकनगरातील आकृती प्रकल्पामध्ये स्थलांतर करण्याची मागणी पालकमंत्र्यांनी यावेळी मान्य केली.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाEknath Shindeएकनाथ शिंदे