शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेच्या विविध विभागात ठाण मांडून बसणाऱ्या ५५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By सदानंद नाईक | Updated: October 15, 2024 21:49 IST

आयुक्तांच्या आदेशामुळे खळबळ

सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिकेच्या विविध विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसणाऱ्या ५५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या आयुक्तांनी मंगळवारी बदल्या केल्या. या आदेशाने मक्तेदारी निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका बसला आहे. 

उल्हासनगर महापालिकेतील विविध विभागात राजकीय वरदहस्तमुळे व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या तब्बल ५५ पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी आयुक्तांच्या आदेशाने काढण्यात आले. या आदेशाने ठाण मांडून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयुक्त विकास ढाकणे यांनी जोर का धक्का दिला. अधीक्षक असलेल्या सलोनी निमकर, रोखपाल असलेले उमेश हजारे, लेखा परीक्षक बेबी माळी यांच्यासह एकून ६ वरिष्ठ लिपिक, एकून २९ लिपिक यांच्यासह सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मजूर, शिपाई आदी कर्मचाऱ्यांचा बदली मध्ये समावेश आहे.

 महापालिका कारभार पारदर्शक व सर्वसमावेशक होण्यासाठी आयुक्त विकास ढाकणे यांनी जनसंवाद सभेचे आयोजन केले. त्यासाठी प्रभाग अधिकारी ऐवजी सहायक आयुक्त असलेल्या अधिकाऱ्यांची मुख्य जनसंवाद अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या नियुक्तीने प्रभाग समिती कार्यालयात काय चालले आहे. हे उघड होऊन प्रभाग अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे.

 प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी महापालिकेत वर्ग-१ व २ ची पदे रिक्त असल्याने, लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्याकडे या पदाचा प्रभारी पदभार तत्कालीन आयुक्तांनी दिला. त्यातील बहुतांश कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेले आहेत. तेही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसल्याने, त्यांची त्या विभागात मक्तेदारी निर्माण झाली. अश्या कर्मचाऱ्यांना मूळ पदावर बदली करून त्याची मक्तेदारी मोडीत काढण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर