शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणात उपवासाच्या पदार्थांची रेलचेल; थाळीला खवय्यांची अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:14 IST

साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरीचा समावेश

ठाणे : श्रावण सुरू झाला की, खवय्यांसाठी उपवासाच्या खमंग पदार्थांची रेलचेल उपहारगृह, हॉटेलमध्ये सुरू होते. एरवी उपवासाच्या दिवशीच मिळणारे हे पदार्थ श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर मिळत असल्याने खवय्ये या पदार्थांवर चांगलाच ताव मारतात. उपवासाच्या पदार्थांमध्ये यंदा ठाणेकर खवय्यांनी या थाळीला अधिक पसंती दिली आहे. त्याचबरोबर उपवासाचे थालीपीठ आणि बटाटापुरीही फॉर्ममध्ये आहे.श्रावण महिन्यात उपवासाच्या पदार्थांसाठी खवय्ये खास उपहारगृहे किंवा मराठमोळी हॉटेल गाठतात. महिनाभर हे पदार्थ दररोज उपलब्ध असतील, असे उपहारगृहाचे मालक केदार जोशी यांनी सांगितले. यात साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरी, ड्रायफ्रुट मलाई मटका लस्सी, साबुदाणा खिचडी, वऱ्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, थालीपीठ, मिसळ, कचोरी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, राजगिरा रोल,भाजणी, थालीपीठ, कचोरी, साबुदाणा वडा, बटाटा वडा, साबुदाणा खिचडी, उपवासाची मिसळ, खरवस, पुरी भाजी, इडली, स्टफ पॅकेज, मसाला दूध, लस्सी, पियुष तसेच, गोड पदार्थांमध्ये गुळाचा खरवस, दुधी हलवा यांसारखे विविध चवींचे, विविध प्रकारांचे पदार्थ श्रावण महिन्यात खास मेन्यू लिस्टमध्ये समाविष्ट केले जातात. उपवासाची थाळी यंदा खवय्यांच्या चांगलीच पसंतीस पडली असल्याने त्याला अधिक मागणी आहे. यात पुरी बटाटा भाजी, शेंगदाणा आमटी, वरीच्या तांदळाचा भात, खीर, श्रीखंड या अन्नपदार्थांचा समावेश असतो. ही थाळी १८० रुपये प्रमाणे मिळत आहे. विशेष म्हणजे हे पदार्थ प्रत्यक्षात उपहारगृह किंवा हॉटेलमध्ये खाण्यासाठी दुपारच्या वेळेस जास्त गर्दी असते, संध्याकाळच्या वेळेस पार्सल नेण्यावर खवय्यांचा भर असतो. गेल्यावर्षी उपवासाच्या पदार्थांचे दर वाढवले होते. यंदा दर स्थिरच ठेवण्यात आले असल्याचे जोशी यांनी सांगितले.पार्सलमध्ये खिचडी, मिसळ, थालीपीठ, कचोरी हे पदार्थ नेण्यावर खवय्यांचा भर असतो. श्रावणात नेहमीच्या साबुदाण्याची खिचडी, उपवासाचे थालीपीठ, बटाटा - रताळ्याचे काप या नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळलेल्या खवय्ये दुपारच्या वेळेस उपवासाच्या थाळीला पसंती देत आहेत.गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम ग्राहकांवर होत आहे. उपहारगृहात दरवर्षी होणारी गर्दी यंदा १० ते १५ टक्क्यांनी ओसरली आहे. पाऊस कमी झाला की ही गर्दी वाढेल, अशी आशा उपहारगृह तसेच, हॉटेल मालक व्यक्त करीत आहेत.