शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

 मेट्रो पिलरमुळे वाहतुकीचा वेग मंदावला

By अजित मांडके | Updated: December 4, 2023 18:27 IST

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याची बाब झाली आहे.

ठाणे: ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याची बाब झाली आहे. त्यात शहरात आता मेट्रोच्या कामाने गती घेतली आहे. मात्र काही ठिकाणी मेट्रोचे स्थानक निर्मिती करता उभारण्यात आलेले पिलर वाहतुकीला अडचणीचे ठरत आहेत. त्याचप्रमाणे दुपारच्या वेळेत मार्गस्थ होत असलेली अवजड वाहने यामुळे मोठया प्रमाणात  होणाऱ्या वाहतूक कोंडीने अक्षरशः नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहे. या समस्येने नागरिक बेजार झाले असून त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.

ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला अनेक विकासकामे सुरु आहेत. त्यातील किती कामे वेळेत पूर्ण होतील हा संशोधनाचा भाग आहे. यात मेट्रोचे काम हे सर्वात महत्वाचे आहे. या कामांचा फार मोठा फटका वाहतूकीला बसत आहे. मेट्रोचे काम कमी आणि फाफटपसाराच अधिक अशी परिस्थिती दिसत आहे. सध्या मेट्रोचे काम जलद गतीने होत आहे. मात्र मेट्रोसाठी स्थानक उभारताना त्याचे पिलर हे रस्त्याच्या मधोमध् उभारले गेले आहेत. परिणामी रस्त्याचा काही भाग या पिलरने व्यापलो जात आहे. त्याने वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे मानपाडा येथे एका खाजगी मॉलच्या ठिकाणी अशाच प्रकारे पिलर उभारला गेल्याने मागील काही दिवसापासून मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होतांना दिसून येते. जोडीला शहरातील वाहनांची संख्या वाढल्याने एका घरात चार चार चारचाकी गाड्या  झाल्या आहेत. मात्र या गाड्या पार्क करायला त्यांच्याकडे जागा नाही. 

शहरातून दुपारी १२ ते ४ यावेळेत अवजड वाहनांची वाहतूक सुरु होते. या वाहतुकीने तर कित्येकदा दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. त्यातही सर्वात मोठी अडचण म्हणजे ही वाहने त्यांच्या ठराविक वेळेपूर्वी शहराच्या सीमेवर येतात. तेव्हा तिथे त्यांना विशिष्ट ठिकाणी उभे ठेवण्याची व्यवस्थाही नाही. त्यामुळे ही वाहतूक कोंडीत अधिकची भर पडते.रात्री ही तशीच परिस्थिती असते. ठाणे शहरात अवजड वाहनांना रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेतच येण्यासाठी परवानगी दिलेली आहे. मात्र ही वाहने रात्री ८ नंतरच प्रवेश करताना दिसतात. कधीकधी तर भर दिवसाही काही गाड्या बिनधास्तपणे शहरात शिरतात. ही अवजड आणि मोठमोठी वाहन शहरात आल्यामुळे सगळ्याच वाहनांची गती मंदावते आणि वाहतूक कोंडी व्हायला कारणीभूत ठरते.याबाबत ठाणे वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले सध्या सुरु असलेली मेट्रो ची कामे, तसेच दुपारच्या वेळेत होणारी अवजड वाहनांची वाहतूक त्यामुळे काही प्रमाणावर कोंडी होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणे