शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

माळशेज घाटातील वाहतूक सुरळीत; रायते पुलावरून अवजड वाहनांना बंदी

By सुरेश लोखंडे | Updated: August 8, 2019 20:55 IST

 पावसाच्या कालावधीत या महामार्गावर रायता पुलाजवळील रस्ता उल्हासनदीच्या पुरात वाहून गेला आहे. या खड्यात भराव टाकून रस्ता दुरूस्त करण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणहून जाण्यास अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देरायते पुलावरून अवजड वाहनांना मात्र बंदीसोमवारपासून घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होतीदाट धुके आणि प्रचंड पाऊस यामुळे अडथळा

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून कल्याण - अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात सतत सुरू असलेल्या पावसामुळे दरडी कोसळल्या असून झाडेही उन्मळून पडली होती. दाट धुके आणि प्रचंड पाऊस यामुळे ती हटवण्यात अडथळा निर्माण झाला. अखेर घाटातील महामार्गावरील मातीचे ढिग व झाडे हटवून बुधवारी संध्याकाळ घाटातील ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. तर रायते पुलावरून अवजड वाहनांना मात्र बंदी घालण्यात आली आहे.                या घाटातील महामार्गावरील सावर्णे गांवाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून दरडी कोसळल्या. तर काही झाडेही उन्मळून पडले होते.  सोमवारपासून घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती. या कामाची पाहाणी करून पोलीस व प्रशासनाकडून बुधवारी संध्याकाळी वाहतूक सुरू करण्यात आल्याचे सुतोवाच कल्याण - अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी लोकमतला सांगितले. घाटात सध्या पावसाचा जोर मंदावलेला असला तरी दाट धुके आह. या समस्येमुळे घाटातील वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. दिवसा देखील चालकांना वाहनांचे लाईट लावावे लागत आहेत.           पावसाच्या कालावधीत या महामार्गावर रायता पुलाजवळील रस्ता उल्हासनदीच्या पुरात वाहून गेला आहे. या खड्यात भराव टाकून रस्ता दुरूस्त करण्यात आलेला आहे. मात्र या ठिकाणहून जाण्यास अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे या महामार्गाने घाटातून जाणारी सर्व अवजड वाहने भिवंडी मार्गे पडघा, टिटवाळा आणि गोवेली येथून पुढे या राष्ट्रीय मार्गाने घाटातून जात आहे. याशिवाय याच मार्गाने तिकडून येणारे बससह सर्व अवजड वाहने त्यांच्या इच्छित स्थळी जात असल्याचे वास्तव दिसून आले. सततच्या पावसामुळे घाटातील दरडी ढिसाळ झाल्यामुळे माती रस्त्यावर पडू नये यासाठी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सतर्कता बाळगली जात आहे. महामार्गावरील या घाटातील आवळ्याची वाडी, मोरोशी, सावर्णे, या भागात दरडींची माती ढासळून पडल्याची शक्यता असल्याचेही दिसून येत आहे.

टॅग्स :thaneठाणेroad transportरस्ते वाहतूक